जालना
दि. 26, (जिमाका) : बुधवार दि. 27 ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
जिल्ह्यातील सर्व किरकोळ देशी/विदेशी मद्य विक्री व ताडी/माडी विक्री अनुज्ञप्ती संपूर्ण
दिवस बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी आशिमा मित्त्ल यांनी दिले आहेत.
या वर्षी 27 ऑगस्ट 2025 या दिवशी गणेश
मुर्तीची स्थापना होणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था
राखण्याच्या दृष्टीने मुंबई मद्य निषेध अधिनियम 1949 चे कलम 142 अन्वये प्रदान करण्यात
आलेल्या अधिकारांचा वापर करुन जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी बुधवार दि. 27 ऑगस्ट
रोजी श्री गणेश चतुर्थी, या दिवशी जिल्ह्यातील सर्व किरकोळ देशी/विदेशी मद्य विक्री
व ताडी/माडी विक्री अनुज्ञप्ती संपुर्ण दिवस बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी श्रीमती
मित्तल यांनी दिले आहेत.
या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची
असून, यामधे कसूर केल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकांविरुध्द मुंबई मद्य निषेध अधिनियम
1949 मधील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. -*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment