खाजगी आस्थापनांनी नोंदणी करावी
जालना, दि. 13 (जिमाका) :- कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व
निवारण) अधिनियम 2013 (POSH Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अधिनियमाचे
कलम 4 नूसार ज्या कार्यालयामध्ये 10 किंवा 10 पेक्षा जास्त कर्मचारी असतील अशा सर्व
खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे तसेच सदर समितीचा बोर्ड आस्थापनेच्या
दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. तरी समितीची माहिती केंद्र शासनाच्या SHE Box
Portal वर नोंदविण्यात यावी, असे आवाहन जिल्हा नोडल अधिकारी तथा जिल्हा महिला
व बाल विकास अधिकारी, जालना यांनी केले आहे.
अधिनियमाचे कलम
26(C) नुसार ज्या आस्थापनेमध्ये समिती स्थापन करण्यात आलेली नाही अशा आस्थापना पन्नास
हजार रुपये दंडास पात्र असेल. त्यानुसार जालना जिल्ह्यातील
सर्व आस्थापनांनी ज्या आस्थापनामध्ये 10 किंवा 10 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत.
अशा सर्व आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती गठीत करण्यात यावी आणि या समिती आस्थापनेच्या
दर्शनी भागात लावण्यात यावी.
SHE Box Portal वर
नोंदणी करण्याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
https://shebox.wcd.gov.in या वेबसाईटवर जाऊन
होम स्क्रीनवर दाखविल्याप्रमाणे अंतर्गत तक्रार समिती नोंदवावी. Private Head office
Ragistration या टॅबवर Click करून आवश्यक त्या सर्व माहितीचा तपशिल भरून Submit या
Tab वर Click करून अंतर्गत तक्रार समितीची माहिती नोंदवता येईल. कामाच्या ठिकाणी महिलांचा
लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 (POSH Act) ची प्रभावी
अंमलबजावणी करण्यासाठी SHE Box Portal वर खाजगी आस्थापनांची नोंदणी करावी, असेही कळविले
आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment