जालना, दि.29 (जिमाका) :- जिल्ह्यात सन 2025 मध्ये
विविध धार्मिक सण, उत्सव व उपक्रम संपन्न होणार असून या सण, उत्सवाच्या काळात
ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर शासन निर्णय व ध्वनी प्रदुषण (नियम व नियंत्रण)
नियम 200 च्या नियम 5 (3) नूसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर श्रोतेगृहे,
सभागृह, सामुहिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागेशिवाय इतर ठिकाणी
ध्वनीची विहीत मर्यादा राखून चालु वर्षातील खालील सण / उत्सव व उपक्रमाच्या दिवशी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट देण्यात आली असल्याचे आदेश
जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तल यांनी जारी केले आहेत.
सण, उत्सव व उपक्रमामध्ये शिवजयंती, ईद-ए-मिलाद, भारतरत्न
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, 1 मे महाराष्ट्र दिन, श्रीकृष्ण जन्माष्टमी (दि.
15.08.2025) अनुक्रमे एक दिवस तर गणपती उत्सवासाठी दि. 27 ऑगस्ट व 6 सप्टेंबर
रोजीचे 2 दिवस तसेच नवरात्री उत्सवातील नवमी आणि दिवाळीतील लक्ष्मीपूजन, ख्रिसमस,
31 डिसेंबर रोजी, विभागीय महसूल क्रीडा स्पर्धा दि.14 व 15 फेब्रुवारी रोजी आणि महत्वाच्या कार्यक्रमासाठी राखीव दोन दिवस अशी सुट जाहीर करण्यात
आली असल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. सण, उत्सवासाठी ध्वनीक्षेपक व
ध्वनीवर्धक वापराबाबतची सुट जिल्ह्यातील शांतता क्षेत्रासाठी लागू नसून त्याची
अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित नगरपालिका, नगर पंचायत, स्थानिक संस्था व
ध्वनी प्रदुषण प्राधिकरणाची राहील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment