जालना दि. 13 (जिमाका) :- शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पुर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेचे
मोठे कृषीची अवजारे ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, हार्वेस्टर आदि वाहतुकीसाठी आणि
शेतमालाच्या जलद व सुरळीत वाहनासाठी शेतरस्त्याबाबत मागणी व आवश्यकता, स्थानिक
भौगोलिक परिस्थितीयाबाबत संबंधित सक्षम अधिकारी यांची तपासणी करुन शेत रस्त्याऐवजी
किमान 3-4 मिटर (12 फुट रुंदीचा रस्ता ) रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करुन
द्यावेत, असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल
अधिनियम 1966 चे कलम 143 व मामलेदार कोर्ट 1906 चे कलम 5 अन्वये रस्त्याचे आदेश
पारित करुन रस्ते खुले करण्यात आले आहेत. जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यात मागील
दोन वर्षात एकुण 76 निर्णय पारित करण्यात आले असून त्यातुन 40 रस्ते खुले करण्यात
आले. तडजोडीआधारे 17 प्रकरणे निकाली काढली तर 19 प्रकरणे न्याय प्रविष्ट आहेत. यात
नवीन रस्ते व रस्ता मोकळा केलेली संख्या
समाविष्ट आहे. सातबारा व इतर अधिकारात नोंद घेण्यासाठी मंडळ अधिकारी, ग्राम महसूल
अधिकारी यांना 21 आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती परतुरचे तहसीलदार डॉ.प्रतिभा
गोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment