जालना दि. 28 (जिमाका) :- हंगाम
2025-26 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानूसार राज्यात नाफेड व
एनसीसीएफच्यावतीने पणन महासंघामार्फत राज्यात कडधान्य व तेलबियांची (मुग, उडिद,
सोयाबीन व तूर) खरेदी करण्यात येणार आहे. आधारभुत दराने खरेदी
करण्यासाठी ई-पिक पाहणी असलेला सातबारा उतारा आवश्यक आहे. तसेच ही खरेदी प्रक्रिया
शेतकऱ्यांच्या हितासाठी पारदर्शक, कार्यक्षम व संपुर्णपणे ऑनलाईन प्रणालीद्वारे
पार पाडली जाणार आहे. केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजनेचा लाभ
घेण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची ई-पिक पाहणी शासनाने
दिलेल्या कालावधीत पुर्ण करावी, असे आवाहन पणन महासंघाकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे
करण्यात आले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment