जालना दि. 28 (जिमाका) :- जालना
जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक (ग्रंथमित्र) यांनी
शासनाच्या विविध पुरस्कारासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जालना यांच्याकडे दि.30
सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी
कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय
संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाचा गुणात्मक विकास व्हावा
या उद्देशाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसेच ग्रंथालय
चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली
रामामृत रंगनाथन यांच्या नावाने डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व
सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार देण्यात येतो. शहरी व ग्रामीण भागातील अ, ब, क आणि ड
वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे 1 लाख, 75 हजार, 50
हजार आणि 25 हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देवून
गौरविण्यात येत असते. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment