जालना, दि. 7 (जिमाका) :- राज्याचे महसूल मंत्री
चंद्रशेखर बावनकुळे हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील
कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहेत.
श्री. बावनकुळे हे शुक्रवार, दि. 8 ऑगस्ट, 2025 रोजी दुपारी 12:30
वाजता मत्स्योदरी मंगल कार्यालय अंबड येथे आगमन व महसूल सप्ताहाच्या जिल्हास्तरीय
समारोप समारंभास उपस्थिती. दुपारी 1.30 वाजता मोटारीने अंबडवरुन जालनाकडे प्रयाण.
दुपारी 2.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे आगमन व नागरिकांची निवेदने
स्विकारण्यासाठी राखीव. दुपारी 3.30 वाजता जिल्हाधिकारी यांच्या समवेत महसूल,
मुद्रांक शुल्क व नोंदणी विभाग, भुमि अभिलेख विभागाच्या आढावा बैठकीस उपस्थित
राहतील. सायंकाळी 6.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस
उपस्थित राहतील. सायंकाळी 7 वाजता भाजपा कार्यालय जालना येथे राखीव. रात्री 8.30
वाजता मोटारीने जालनावरुन मोतिबाग –राजूर मार्गे भोकरदनकडे प्रयाण करतील. रात्री
9.30 वाजता भोकरदन येथे आगमन व मुक्काम करतील.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment