जालना दि. 7 (जिमाका) :- जालना येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अंतिम वर्षात प्रशिक्षण घेत असलेल्या तसेच आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांसाठी सोमवार दि.11 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता शिकाऊ भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी छत्रपती संभाजीनगर व जालना येथील नामांकित कंपनीचे प्रतिनिधी हजर राहणार आहेत. तरी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सह.प्रशिक्षणार्थी सल्लागार, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
No comments:
Post a Comment