Monday, 30 June 2025

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा, पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

 


 

जालना दि.30 (जिमाका) : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्हयात दि. 30 जुन ते 7 जुलै 2025 रोजी यलो  (Yellow) अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (ताशी 30-40 कि.मी.प्र.ता. वेगाने) हलका ते मध्यम स्वरुपाची पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच दि. 3 व 4 जुलै 2025 रोजी हलक्या स्वरुपाचा पाऊस स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील नागरीकांना खालीलप्रमाणे दक्षता घेणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.

            मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे,मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफोर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अर्थातरी लटकणा-या / लोंबणा-या तारांपासून दूर रहावे.वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा.अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतक-यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी,जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.

सर्व नागरीकांनी वादळी वारे, वीज पासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना 02482-223132 वर तसेच नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधाण्याचे आवाहजन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गणेश महाडिक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

 

Friday, 27 June 2025

दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

 


 

जालना, दि.27 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) दि. 24 जून 2025 ते 16 जुलै 2025 या कालावधीत जालना जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. तरी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त शक्तीचा वापर करुन अपर जिल्हादंडाधिकारी गणेश महाडिक यांनी परीक्षा केंद्राचे 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

इयत्ता बारावीची परीक्षा  1)जे.ई.एस. कॉलेज, जालना 2) मत्स्योदरी आर्टस अॅण्ड सायन्य कॉलेज, अंबड 3) एल.बी.एस.आर्टस अॅण्ड कॉमर्स ज्युनीयर कॉलेज, परतूर 4) रामेवर, आर्टस अॅण्ड कॉमर्स ज्युनियर कॉलेज, भोकरदन

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) दि. 24 जून  ते 8 जूलै 2025 या कालावधीत जालना जिल्ह्यातील 1) उर्दू हायस्कुल, कचेरी रोड़, जुना जालना. 2) सेन्ट जॉन्स इंग्लीश स्कुल, साई नगर, जालना. 3) समर्थ विद्यालय, पाचोड रोड, अंबड. 4) जिल्हा परिषद हायस्कुल, घनसावंगी. 5) श्री.योगानंद माध्यमिक विद्यालय, परतूर 6) रेणुका विद्यालय, मंठा या 6 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.

केंद्राचे परिसरात अशांतता निर्माण होवून परीक्षा कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखणे प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणुन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागु करण्यात आले आहे.

आदेशात नमुद कालावधीकरीता सर्व सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी बंद ठेवणेकरीता याद्वारे प्रतिबंधात्मक आदेश लागु केले आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी नोटीस देण्यास पुरेसा कालावधी नसल्याने व परीक्षा सुरळीत पार पाडण्याचे दृष्टीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) नुसार सदर आदेश एकतर्फी काढण्यात आला आहे. सदर आदेशाची प्रसिध्दी पोलीस अधिक्षक, जालना यांनी ध्वनिक्षेपकाद्वारे करावी. हा आदेश परीक्षेच्या दिवशी सकाळी 9  वाजेपासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत अंमलात राहील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदाच्या भरतीचे आयोजन

 


   

जालना,दि.27 (जिमाका) :  नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई गट-ड संवर्गात 284 पदे भरतीसाठी दि.22 एप्रिल 2025 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. तरी आयबीबीएसच्या संकेतस्थावर यशस्वीरित्या भरलेले अर्ज  पात्र उमेदवारांची परीक्षा दि.1 ते 8 जुलै 2025 या कालावधीत ऑनलाईन घेण्यात येणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर आयबीपीएसकडून पाठविण्यात येणार आहे. असे सह जिल्हा निबंधक वर्ग-1  मुद्रांक जिल्हाधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

लोकशाही दिनाचे आयोजन

 


 

       जालना दि.27 (जिमाका) : जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दि. 7 जुलै 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

लोकशाही दिनात अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज 15 दिवस अगोदर दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे.  लोकशाही दिनासाठी अर्ज देताना संबंधित तालुक्यातील तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज दिलेला असावा व तालुकास्तरीय लोकशाही दिनात एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊनदेखील कोणतीही कार्यवाही झालेली नसावी अशाच अर्जदारांनी टोकन क्रमांकाच्या पावतीसह अर्ज दोन प्रतीत सादर करावा. लोकशाही दिनामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्वी, अपील, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. तसेच तालुकास्तरीय लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची तहसिलदार यांच्या स्वाक्षरीची पोहोच पावती व त्यासाठी दिलेल्या मुदतीत व नमुन्यात ज्यांनी यापूर्वीच्या आवश्यक कागदपत्रासह अर्ज केले असतील त्यांना तक्रार मांडता येईल.  ज्यांनी यापूर्वी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेला आहे परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही, अशा तक्रारदारांनी पुन्हा अर्ज करु नयेत.  तसेच लोकशाही दिनात द्यावयाच्या अर्जाचा विहित नमुना http://jalna.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेसाठी अर्ज करावेत

 


       जालना दि.27 (जिमाका) : बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना सन 2025-26 या वर्षात जिल्हा परिषदेस 32 लक्ष रुपये निधी शासनाकडुन मंजुर करण्यात आला आहे.  तरी जालना जिल्ह्यातील अनुसुचित जमाती प्रवर्गातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेचा लाभ घेण्यात यावा,  असे अवाहन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी जगदिश मिनियार व अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी केले आहे.

अनुसुचित जमाती प्रर्वगातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतीसाठी अर्थ सहाय्य देण्याची सन 1992-93 पासुन राबविण्यात येत असलेली विशेष घटक योजना दि. 30.12.2017 च्या शासन निर्णयाव्दारे बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना या नावाने राबविण्यात येते. या योजनेस शासनाच्या सामाजिक न्याय विभागा कडुन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प छत्रपती संभाजीनगर यावे मार्फत जिल्हा परिषदेस निधी उपलब्ध करुन दिला जातो. सन 2020-21 पासुन महाडीबीटी पोर्टलव्दारे या योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली असुन या योजनाअंतर्गत ऑनलाईन अर्ज स्वीकृती पासुन लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान अदा करण्यापर्यतची सर्व सुविधा महाडीबीटी पोर्टलव्दारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना पुढिल प्रमाणे खालील घटकासाठी त्यापुढे नमुद रक्कमेच्या उच्चयतम अनुदान मर्यादेत राबविण्यात येते. लाभासाठी संपर्क तालुकास्तरावर पंचायत समितीमधील कृषि अधिकारी तर जिल्हास्तरावर  जिल्हा परिषदेतील कृषि विकास अधिकारी यांच्याकडे साधावा. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा

 


 

जालना दि.27 (जिमाका) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म दिवस 26 जून दरवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना या कार्यालयाच्या वतीने दि. 26 जून, 2025 रोजी सकाळी 10 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रम आमदार अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमास केलेल्या अध्यक्षीय भाषणात आमदार अर्जुन खोतकर यांनी राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांनी दुर्बल व पिडीत घटकांसाठी केलेल्या कार्याचा ऊहापोह करुन शाहु महाराजाचे शिक्षणविषयक कार्य व सामाजिक विषमता दूर करण्यासाठी घेतलेला पुढाकार आजच्या परिस्थितीतही तंतोतंत लागु असल्याचे सांगितले.

कार्यक्रमात आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्काराचा 5 हजार रुपयांचा धनादेश कु. प्रज्ञा अरविंद सोनकांबळे, मुलींची शासकीय निवासी शाळा, जालना या विद्यार्थीनींस वितरण करण्यात आला.  तसेच संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळ यांच्यामार्फत सन 2017-18 मधील महिला समृध्दी योजनेअंतर्गत श्रीमती बेबी दशरथ जोहरे, देवका मगन जोहरे यांना प्रत्येकी रुपये 50 हजार रुपयांचा धनादेश वितरीत करण्यात आला.  

डॉ. निकेश मदारे यांनी यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक कार्याबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश अंबुरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. दिलीप गिरी यांनी केले. रामेश्वर कर्दळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रमास जिल्हा व्यवस्थापक तथा विभागीय अधिकारी अरुण राऊत, अनिल सुनगत,  सुर्यकांता गोसावी, श्रीमती पाटोळे यांच्यासह नागरिक अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-*-

जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून विशेष मोहिम; मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे समितीकडून आवाहन

 


 

जालना दि.27 (जिमाका) : राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वच्या अनुषंगाने दि. 26 जुन ते 4 जुलै 2025  या कालावधीत राज्यातील अकरावी व बारावी विज्ञान शाखेतील मागासवगीय विज्ञान शाखेतील सर्व मागासवगीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणत्र मिळण्यासाठी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती जालना मार्फत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

या विशेष मोहिमेनिमित्त दि. 26 जुन 2025 रोजी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने 163 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सीईटी तसेच इयत्ता अकरावी, बारावी विज्ञान शाखेतील 2025-26 मधील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. अर्जदारांची प्रकरणे त्रुटी पुर्ततेअभावी समितीकडे प्रलंबित आहेत अशा अर्जदारांना लेखी पत्र व ई-मेल व दुरध्वनीव्दारे त्रुटी पुर्ततेबाबत कळवूनही अर्जदारांनी अद्याप त्रुटीची पुर्तता केलेली नाही अशा अर्जदारांची प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. असेही जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 173 उमेदवारांची निवड

 


 

जालना दि.27 (जिमाका) :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना अणि कला, विज्ञान व वाणिज्‍य महाविद्यालय पाथ्रीकर कॅम्‍पस बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार दि. 26 जून, 2025 रोजी रोजी कला, विज्ञान व वाणिज्‍य महाविद्यालय पाथ्रीकर कॅम्‍पस, बदनापूर येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात 173 उमेदवारांची विविध उद्योजकांनी नोकरीसाठी निवड केली.

रोजगार मेळाव्यामध्ये विविध उद्योजकांनी 1 हजार 87 रिक्त पदे अधिसुचित केली होती. या अनुषंगाने रोजगार मेळाव्यास 569 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 173 उमेदवारांची विविध उद्योजकांनी नोकरीसाठी निवड केली. यामध्ये एल.जी. बी. प्रा.लि.जालना  7 पदे, विक्रम टी प्रोसेसर प्रा.लि. जालना 10 पदे,  एन. आर.बी. बेअरींग प्रा.लि. 20 पदे, भुमि कॅाटेक्‍स इंडस्‍ट्री प्रा.लि. जालना 10 पदे, देवअश्‍व होंडा शोरूम जालना 5 पदे, सलाम किसान अॅण्‍ड प्राईम अक्रोस्‍पेस प्रा.लि. जालना 6 पदे, प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन छत्रपती संभाजीनगर 15 पदे, डिस्‍टील एज्‍युकेशन अॅण्‍ड टेक्‍नॅालॉजी प्रा.लि. छत्रपती संभाजीनगर 20 पदे, डायनामिक ट्रान्समिशन प्रा.लि. छत्रपती संभाजीनगर 13 पदे, फुलंब्री टेक्‍स. कॉम. प्रा.लि. जालना 10 पदे, बीव्हीजी इंडिया प्रा. लि.पुणे 19 पदे, प्रभात सीटीई छत्रपती संभाजीनगर 30 पदे, वैभव इंटरप्राईजेस  प्रा. लि. 5 पदे असे एकुण 173 उमेदवारांची निवड करण्यात झाली. निवडीमध्ये  162 पुरूष व 11 महिलांचा समावेश आहे. रोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी उपायुक्त विद्या शितोळे, सहायक आयुक्त गणेश चिमणकर, भुजंग रिठे, अमोल बोरकर, आत्माराम दळवी, डॉ. अमोल परिहार, प्रदीप डोळे, अक्रुर अटकळ, रवी पाडमुख, विशाल जगरवाल, उमेश कोल्हे, दिनेश उढाण, अमर तुपे, दीपक पालवे यांनी परिश्रम घेतले. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

अनुसूचित जाती- जमातीच्या बेरोजगारांसाठी उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

 


 

जालना दि.27 (जिमाका) :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती नव उद्योजकांसाठी विशेष सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत सन 2025-26 करिता निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत मराठवाडा विभागामध्ये 320 नव उद्योजकांना निवासी  उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम व तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन विभागीय स्तरावर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी करण्यात आले आहे. तरी प्रशिक्षण कार्यक्रमाचा जालना जिल्ह्यातील बेरोजगार होतकरू तरुण युवक- युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्र  महाव्यवस्थापक योगेश सारणीकर व प्रकल्प अधिकारी विनोद तुपे यांनी केले आहे.

 प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये उद्योग संधी,  उद्योगाची निवड, उद्योगाचे व्यवस्थापन, लघुउद्योग, सेवा उद्योग, व्यापार उद्योग उद्योगातील विविध टप्पे,  उद्योजकीय गुणसंपदा,  उद्योगाची जाहिरात,  मार्केटिंग, संवाद कौशल्य, प्रकल्प अहवाल, शासकीय कर्ज व अनुदान विषयक योजनांची माहिती, प्रत्यक्ष उद्योगांना भेटी, यशस्वी उद्योजकाचे मार्गदर्शन, उद्योगासाठी लागणारे परवाने, लायसन्स, आदि विषयावर निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन करण्यात येणार असून सदरील प्रशिक्षण कार्यक्रम हा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मुख्य कार्यालय छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाची व्यवस्था करण्यात आली असून सदरील प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या लाभार्थींचे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव तयार करण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र  (MCED) जालना द्वारा- मराठा बिल्डींग (पार्क), विशाल कॉर्नर छत्रपती संभाजीनगर चौफुली, जालना येथे संपर्क साधावा.  असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

Thursday, 26 June 2025

छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांना अभिवादन


 


 

जालना, दि.26 (जिमाका) :- जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन  अभिवादन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, नायब तहसीलदार सतीश तायडे, दिपाली राऊत,अतुल केदार, संपदा कुलकर्णी, मिनाक्षी देवाशी, रवींद्र हेलगट यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-*-

 

जिल्ह्यातील एकही सुशिक्षीत तरुण बेरोजगार राहणार नाही - मंत्री मंगलप्रभात लोढा

 

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतल्या मॅरेथॉन बैठका


* रोजगार मेळावा उत्साहात संपन्न

जालना, दि.26 (जिमाका) :- राज्यात जालना हे औद्योगिकीकरण झपाट्याने वाढणारे शहर म्हणून नावारुपास येत आहे. येथील तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी तसेच स्वयंरोजगाराच्या वाटा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासन सकारात्मक पावले टाकत आहेत. तरी स्थानिक औद्योगिक कंपन्यामध्ये ज्या रोजगार कौशल्याची मागणी असेल त्या व्यवसायातील प्रशिक्षण देवून उमेदवारात कौशल्य वाढवून कुशल मनुष्यबळ औद्योगिक प्रशिक्षण संस्थ्‍ोच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिले जाईल. त्यामुळे प्रत्येकाच्या हाताला काम मिळाल्याने जालना जिल्ह्यातील एकही सुशिक्षीत तरुण बेरोजगार राहणार नाही,  अशी नि:संदिग्ध ग्वाही राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

            कला विज्ञान व  वाणिज्य महाविद्यालय पाथ्रीकर कॅम्पस,  बदनापूर येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, कौशल्य विकास विभाग आयुक्त लहू माळी, कौशल्य विकास विभाग सहायक आयुक्त गणेश चिमणकर, कौशल्य विकास विभाग उपायुक्त विद्या शितोळे, देवेश पाथ्रीकर, सहसंचालक पी.टी.देवतळे, डॉ.जकीर पठाण यांच्यासह संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, उद्योजक व शासन एकत्र येवून काम केले तर निश्चित महाराष्ट्राची भरभराट होईल. याकरीता पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप महत्वाची आहे. ही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राबवून कुशल मनुष्यबळाची निर्मिती केली जाणार आहे.  पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 40 कंपन्यांनी आज रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. कायदा व सुव्यवस्था आणि मनुष्यबळ या आधारावरच नवीन उद्योग उभारत असतो. उद्योग उभारणीत कुशल मनुष्यबळ अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्यामुळे कुशल मनुष्यबळाची उभारणी करणे गरजेचे आहे.  उद्योजकांच्या तांत्रिक गरजेनूसार आयटीआयच्या माध्यमातून नवनवीन व्यवसाय चालु करण्यात येणार आहेत. नवीन व्यवसायासाठी लागणारी मशिनरी शासनाकडून तातडीने पुरविण्यात येईल. संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी गुणवत्तेसह  प्रामाणिकपणे आपले काम पार पाडावे. अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली.

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतल्या मॅरेथॉन बैठका

जनसंवाद/जनता दरबार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसंदर्भात बैठक, पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानव दर्शन हिरक महोत्सव जिल्हास्तरीय समिती बैठक, जिल्हा कौशल्य विभाग आढावा बैठक, संस्था व्यवस्थापन समितीच्या मॅरेथॉन बैठका घेत  संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले.

            सर्व बैठकीस आमदार बबनराव लोणीकर, आमदार अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल,  कौशल्य विकास विभाग सहायक आयुक्त गणेश चिमणकर, कौशल्य विकास विभाग उपायुक्त विद्या शितोळे, सहसंचालक पी.टी.देवतळे,  यांच्यासह संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

-*-*-*-*-

Wednesday, 25 June 2025

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

 


 

जालना, दि.25 (जिमाका) :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म दिवस दि.26 जुन दरवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तरी सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने दि.26 जुन 2025 रोजी सकाळी 10 वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जालना येथे समाजकल्याण कार्यालयाच्यावतीने मुख्य कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले आहे. तरी सामाजिक न्याय दिनाच्या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक आयुक्त राजू एडके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

सामाजिक न्याय दिनाच्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी जगदिश मिनियार  आदि उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमापुर्वी सकाळी 8 वाजता नुतन वसाहत येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांचा पुतळा ते सामाजिक न्याय भवनापर्यंत समता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. समता दिंडी नुतन वसाहत येथून भाजी मंडई ते शासकीय रुग्णालय मार्गे येवून सामाजिक न्याय भवन येथे समता दिंडीचा समारोप होईल. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

जिल्हाधिकारी कार्यालयात आणीबाणीतील चित्रांचे प्रदर्शन महिनाभर खुले राहणार

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे

सन्मानपत्र देऊन कार्याचा गौरव करण्यात आला

  • संविधान हत्या दिवस-2025 कार्यक्रम

  •  

  जालना, दि.25 (जिमाका) :- देशात 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती. या घटनेला आज 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने आणीबाणीत लढा दिलेल्या जालना जिल्ह्यातील व्यक्तींचा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते शाल, प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देवून सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी उपस्थित सर्वांचे कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले. मानधन प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचे नियोजन केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच मानधनासंदर्भात काही अडचणी असल्यास त्या संबंधित कक्षात नोंदविण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी यावेळी केले.

आणीबाणीला 50 वर्षे पुर्ण भारतीय इतिहासातील काळाकुट्ट अध्याय..! संविधान हत्या दिवस-2025 या कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार नारायण कुचे, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांच्यासह आणिबाणीत कारावास भोगलेल्या व्यक्तींची उपस्थिती होती.

1975 ते 1977 या आणीबाणीच्या कालावधीत जालना जिल्ह्यातील 56 व्यक्तींनी सामाजिक आणि राजकीय कारणांसाठी कारावास भोगला होता. या व्यक्तींना सन्मानपत्र देऊन गौरविण्याच्या सूचना शासनाकडून प्राप्त झाल्या होत्या. जिल्ह्यातील 56 व्यक्तींपैकी उपस्थित व्यक्तींचा सन्मान या जिल्हास्तरीय कार्यक्रमात करण्यात आला. तसेच प्रत्येक संबंधित तालुक्यातही अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

1975 ते 1977 काळात लागू केलेल्या आणीबाणीच्या काळात भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी व मुल्याच्या जपणुकीसाठी अत्यंत कठोर परिस्थ‍ितीत निडरपणे उभे राहिलात. आपण हुकुमशाहीचा धाडसाने प्रतिकार करून, कारावास स्वीकारून स्वातंत्र्य अभिव्यक्ती आणि लोकशाहीच्या मूल्यांसाठी संघर्ष केला. देशाच्या लोकशाही परंपरेचे रक्षण करण्याच्या या लढ्यातील आपल्या योगदानाचा आम्ही अभिमानाने गौरव करीत आहोत. हे सन्मान पत्र आपल्या त्याग, धैर्य आणि दृढतेला सलाम करण्यासाठी आहे. आपण आपल्या कृतीतून विचारांतून आणि त्यागातून नव्या पिढीसमोर लोकशाही मुल्यांचा आदर्श ठेवला आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन्मान पत्रात नमूद केले आहे.  

जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील अपर जिल्हाधिकारी यांच्या कक्षासमोरील सभागृहात आणीबाणी कालावधीतील चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील प्रदर्शन एक महिनाभर सर्वांसाठी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत खुले राहणार आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

-*-*-*-*-

 

 

Tuesday, 24 June 2025

26 जुनला पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा; · मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्‍या हस्‍ते उदघाटन

  

जालना, दि.24 (जिमाका) :- जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,जालना अणिकला, विज्ञान व वाणिज्‍य महाविद्यालय पाथ्रीकर कॅम्‍पस बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार दि. 26 जून, 2025 रोजी कला, विज्ञान व वाणिज्‍य महाविद्यालय पाथ्रीकर कॅम्‍पसजालना - छत्रपती संभाजी नगर रोड  ता.बदनापूर जि.जालना येथे सकाळी 10 ते दुपारी वाजेपर्यंतपंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी अंदाजे 1 हजार 87 पेक्षा अधिक रिक्त पदे उपलब्ध आहेत. कौशल्य विकासरोजगारउद्योजकता  नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्‍या हस्‍ते मेळाव्‍याचे  उदघाटन होणार  आहे. रोजगार मेळावा हा मेळाव्‍याचे अध्‍यक्ष आमदार नारायण कुचे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार आहे.

 

मेळाव्यात दहावीबारावीआय.टी.आय.ऑल ट्रेडबी..,बी.कॉम, बी.एससी., एम.कॉम,बी. ई., बी. टेक डिप्‍लोमाधारक इत्यादी पात्रता धारक नोकरी इच्छूक उमेदवारासाठी एकूण 1 हजार 87 रिक्त पदे उपलब्ध असून मुलाखतीसाठी विविध 14 कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये एल.जी. बालकृष्‍णन अॅण्‍ड ब्रॅास प्रा.लि.जालना  45 पदेविक्रम टी प्रोसेसर प्रा.लि. जालना यांची 17 पदे,  एन. आर.बी. बेअरींग प्रा.लि. यांची 70 पदेभुमि कॅाटेक्‍स  इंडस्‍ट्री प्र.लि. जालना यांची 16 पदे, देव अश्‍व होंडा शोरूम  जालना यांची 29 पदे, सलाम किसान अॅण्‍ड  प्राईम अक्रोस्‍पेस प्रा.लि. जालना यांची 20 पदेप्रथम एज्युकेशन फाऊंडेशन छत्रपती संभाजीनगर यांनी 60 पदेयुवा शक्‍ती स्‍कि‍ल इंडिया प्रा.लि. छत्रपती संभाजीनगर यांची 100 पदेडिस्‍टील एज्‍युकेशन अॅण्‍ड टेक्‍नॅालॉजी प्रा.लि. छत्रपती संभाजीनगर  यांची 50 पदे, डायनामिक ट्रान्समिशन प्रा.लि. छत्रपती संभाजीनगर यांची 50 पदेफुलंब्री टेक्‍स. कॉम. प्रा.लि. जालना यांची 150 पदे, बीव्हीजी इंडिया प्रा. लि.पुणे यांची 230 पदेश्रीकृपा सर्व्हिसेस प्रा.लि.  पुणे यांची 150 पदे,  वैभव इंटरप्राईजेस  प्रा. लि. यांची 100 पदे, असून या मेळाव्यासाठी वरील 14 नामांकित कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहणार असुन पात्र उमेदवारांच्या चाचणी  मुलाखती घेऊन विविध पदांच्या रिक्त जागांसाठी निवड  भरती करणार आहेत.

             स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय-या विविध महामंडळाचे स्टॉल लावून स्वंयरोजगाराच्या योजनेची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहेसोबतच महामंडळमार्फत मंजूर केलेल्या प्रकरणातील टॅक्ट्ररचे वितरण करण्यात येणार आहे सर्व बॅंकांनी मंजूर केलेल्या कर्जमंजुरीप्रमाणे पत्राचे वितरण सुध्दा करण्यात येणार आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ नवीन योजना सुरु झाल्याचा सोशल मीडिया संदेश, कथित दलालांपासून सावधान

 


 

जालना, दि.24 (जिमाका) :- मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळामार्फत व्यवसायासाठी डिलीव्हरी बॉय, वाहन कर्ज आदि नवीन योजना सुरु करण्यात आलेल्या आहेत. या प्रकारची अफवा सोशल मीडिया तसेच कथित दलालाद्वारे पसरविल्या जात आहे. तरी अशा प्रकारच्या कोणत्याही नवीन योजना सुरु करण्यात आलेल्या नसल्याने या अफवांपासून तसेच आर्थिक फसवणुकीपासून सावधानता बाळगावी,  असे आवाहन संचालक शाह आलम खान व जिल्हा व्यवस्थापक एकनाथ कांबळे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळामार्फत राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त निगम यांच्याकडून कर्ज स्वरुपात उपलब्ध होणाऱ्या निधीतून शैक्षणिक कर्ज, मुदत कर्ज, सुक्ष्म पतपुरवठा कर्ज अशा प्रकारच्या विविध योजना राबविल्या जातात. सद्यस्थितीत शैक्षणिक कर्ज योजना ही एकमेव चालु आहे तर बाकीच्या योजना पुढील आदेशापर्यंत बंद आहेत. तरी अल्पसंख्यांक समुदायातील नागरिकांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडू नये तसेच कोणी आर्थिक फसवणुक करीत असल्यास संबंधित व्यक्तीविरुध्द जवळच्या पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंद करावी. जेणेकरुन आपली व इतर नागरिकांची फसवणूक होणार नाही. जालना शहरातील दुखी नगर, मिल्लत नगर, तट्टूपुरा आणि कुचरवटा आदि वसाहतीमध्ये काही महिला कर्ज मंजूर करुन देते म्हणून इतर महिलांकडे पैशांची मागणी करीत आहेत. अशा आशयाची तक्रार संचालक शाह आलम खान यांच्याकडे प्राप्त झाली आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

26 जुनला पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा; · मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्‍या हस्‍ते उदघाटन

 


 

जालना, दि.24 (जिमाका) :- जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,जालना अणिकला, विज्ञान व वाणिज्‍य महाविद्यालय पाथ्रीकर कॅम्‍पस बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार दि. 26 जून, 2025 रोजी कला, विज्ञान व वाणिज्‍य महाविद्यालय पाथ्रीकर कॅम्‍पस, जालना - छत्रपती संभाजी नगर रोड  ता.बदनापूर जि.जालना येथे सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंतपंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी अंदाजे 1 हजार 87 पेक्षा अधिक रिक्त पदे उपलब्ध आहेत. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्‍या हस्‍ते मेळाव्‍याचे  उदघाटन होणार  आहे. रोजगार मेळावा हा मेळाव्‍याचे अध्‍यक्ष आमदार नारायण कुचे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार आहे.

 

मेळाव्यात दहावी, बारावी, आय.टी.आय.ऑल ट्रेड, बी..,बी.कॉम, बी.एससी., एम.कॉम,बी. ई., बी. टेक डिप्‍लोमाधारक इत्यादी पात्रता धारक नोकरी इच्छूक उमेदवारासाठी एकूण 1 हजार 87 रिक्त पदे उपलब्ध असून मुलाखतीसाठी विविध 14 कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये एल.जी. बालकृष्‍णन अॅण्‍ड ब्रॅास प्रा.लि.जालना  45 पदे, विक्रम टी प्रोसेसर प्रा.लि. जालना यांची 17 पदे,  एन. आर.बी. बेअरींग प्रा.लि. यांची 70 पदे, भुमि कॅाटेक्‍स  इंडस्‍ट्री प्र.लि. जालना यांची 16 पदे, देव अश्‍व होंडा शोरूम  जालना यांची 29 पदे, सलाम किसान अॅण्‍ड  प्राईम अक्रोस्‍पेस प्रा.लि. जालना यांची 20 पदे, प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन छत्रपती संभाजीनगर यांनी 60 पदे, युवा शक्‍ती स्‍कि‍ल इंडिया प्रा.लि. छत्रपती संभाजीनगर यांची 100 पदे, डिस्‍टील एज्‍युकेशन अॅण्‍ड टेक्‍नॅालॉजी प्रा.लि. छत्रपती संभाजीनगर  यांची 50 पदे, डायनामिक ट्रान्समिशन प्रा.लि. छत्रपती संभाजीनगर यांची 50 पदे, फुलंब्री टेक्‍स. कॉम. प्रा.लि. जालना यांची 150 पदे, बीव्हीजी इंडिया प्रा. लि.पुणे यांची 230 पदे, श्रीकृपा सर्व्हिसेस प्रा.लि.  पुणे यांची 150 पदे,  वैभव इंटरप्राईजेस  प्रा. लि. यांची 100 पदे, असून या मेळाव्यासाठी वरील 14 नामांकित कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहणार असुन पात्र उमेदवारांच्या चाचणी मुलाखती घेऊन विविध पदांच्या रिक्त जागांसाठी निवड भरती करणार आहेत.

             स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय-या विविध महामंडळाचे स्टॉल लावून स्वंयरोजगाराच्या योजनेची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सोबतच महामंडळमार्फत मंजूर केलेल्या प्रकरणातील टॅक्ट्ररचे वितरण करण्यात येणार आहे सर्व बॅंकांनी मंजूर केलेल्या कर्जमंजुरीप्रमाणे पत्राचे वितरण सुध्दा करण्यात येणार आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-