Tuesday, 9 December 2025

जिल्ह्यातील पशुपालकांना आवाहन

 

 

जालना दि. 9 (जिमाका) :-  जालना जिल्ह्यात विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प टप्पा २ अंतर्गत पशुपालकांसाठी विविध योजना महाराष्ट्र शासनाने विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये सन २०२४-२५ ते २०२७-२८ या कालावधीमध्ये दुग्धविकास प्रकल्प टप्पा २ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामध्ये जालना जिल्ह्याचा समावेश असून ग्रामीण भागातील पशुपालकांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत.  ५० टक्के अनुदानावर उच्च दुधउत्पादन क्षमता असलेल्या १ दुधाळ गाय/म्हशीचे वाटप.  ७५ टक्के अनुदानावर उच्च दुधउत्पादन क्षमता असलेल्या १ भृनाचे प्रत्यारोपण केलेली सात महिन्याची गाभण कालवड वाटप.  २५ टक्के अनुदानावर प्रजनन पूरक खाद्य पुरवठा.  २५ टक्के अनुदानावर फट व एसएनएफ वर्धक खाद्य पुरवठा.  ५० टक्के अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र वाटप.  २५ टक्के अनुदानावर मुरघास पुरवठा.  १०० टक्के अनुदानावर सावर बहुवार्षिक चारा पिके घेण्यासाठी बियाणे/ठोंबे वाटप. तरी या योजनांचा लाभ घेण्याकरीता जास्तीत जास्त पशुपालकांनी www.vmddp.com या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, जालना यांनी केले आहे. तसेच योजनांसंबंधी अधिक माहितीकरीता विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प टप्पा २ चे जिल्हा प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल जाधव जालना यांना ८६०५४५१८५० या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment