Monday, 8 December 2025

जनजागृती, समन्वय आणि अंमलबजावणी या त्रिसूत्रीवर काम केल्यास अपघातांना आळा बसेल जालना दि. 8 (जिमाका) :- जिल्ह्यातील रस्ते अपघात रोखण्यासाठी जनजागृती मोहिम राबाविणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वय ठेवून काम करावेत. जनजागृती, समन्वय आणि अंमलबजावणी या त्रिसूत्रीवर काम केल्यास जिल्ह्यातील अपघातांना निश्चितच आळा बसेल, असे प्रतिपादन अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी यांनी केले. जिल्ह्यात अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने नुकतीच एक महत्त्वाची रस्ता सुरक्षा विषयक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस प्र.अपर जिल्हाधिकारी नम्रता चाटे, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता स्मिता पवार यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. अपघात कमी करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तरुणांमध्ये सुरक्षित वाहतूक नियमांबद्दल जागरूकता निर्माण करणे हे दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे ठरेल. केवळ नियम बनवून चालणार नाही, तर त्यांची कठोर अंमलबजावणी आणि अपघात प्रवण ठिकाणे सुधारण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्ह्यात घडलेल्या मोटार वाहन अपघाताच्या प्रकरणाचा मागील तीन वर्षातील संख्येचा आढावा घेण्यात आला. -*-*-*-*-

No comments:

Post a Comment