Monday, 8 December 2025

ग्राहकांना तक्रार नोंदविण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध - प्र. अपर जिल्हाधिकारी नम्रता चाटे जालना दि. 8 (जिमाका) :- जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे मुख्य उद्दिष्ट ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे असे आहे. तसेच ग्राहकांच्या तक्रारींची त्वरित सोडवणूक करणे हे देखील परिषदेचे कार्य आहे. या उद्देशांसाठी, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेने ग्रामीण भागात विविध माध्यमांद्वारे ग्राहक जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवावी. तसेच जालना जिल्ह्यातील ग्राहकांना तक्रार नोंदविण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी अपर जिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी केले आहे. जिल्ह्यातील ग्राहकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक प्रभारी अपर जिल्हाधिकारी नम्रता चाटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी तथा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सचिव सविता चौधर यांच्यासह ग्राहक संरक्षण परिषदेचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते. सध्या अनेक विभागांनी तक्रारी नोंदवण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांनी या सुविधेचा वापर करून आपल्या तक्रारी ऑनलाइन नोंदवाव्यात. तसेच, nic.jalna या संकेतस्थळावर ग्राहकांच्या समस्यांसाठी पोर्टल उपलब्ध आहे. ग्राहकांच्या हिताशी संबंधित तक्रारी असल्यास त्या ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने सादर कराव्यात, जेणेकरून त्यांच्या समस्यांचे निराकरण लवकरात लवकर केले जाईल. जिल्ह्यात राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन दि.24 डिसेंबर 2025 रोजी करण्यात येणार असून सर्व सदस्यांनी ग्राहक दिन साजरा करण्याबाबत आपल्या संकल्पना सांगाव्यात. असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी अशासकीय सदस्यांनी दाखल केलेल्या तक्रारींचे समाधान करुन निराकरणही करण्यात आले. -*-*-*-*-

No comments:

Post a Comment