Thursday, 11 December 2025

ध्वज दिन निधी संकलनाचे उद्दीष्ट पूर्ण करावे-जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

 






       

जालना, दि.11(जिमाका): सशस्त्र सेना ध्वज दिन भारतीय सशस्त्र दलातील शूर सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या योगदानाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी तसेच विशेषतः आपले सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांकरीता विविध कल्याणाकारी योजना राबविण्यासाठी आणि मदत करण्यासाठी साजारा केला जातो समर्पित. जिह्याला ध्वज दिन निधी संकलनाचे 2025 साठी 46 लाख 50 हजार रूपयांचे उद्दीष्ट असून, सर्व विभागांनी आपले उद्दीष्ट पूर्ण करावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी  केले.

येथील जिल्हा सैनिक कार्यालयात आज सशस्त्र सेना ध्वजदिन 2025 निधी संकलन शुभारंभाच्या कार्यक्रमात श्रीमती मित्तल बोलत होत्या. यावेळी पोलीस उपनिरिक्षक आर. डी. निकाळजे, उपशिक्षणाधिकारी (मा.) अनिल पवार, शिक्षणाधिकारी (प्रा.) संजय कायंदे, जॉन नवगिरे आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वॉड्रन लिडर डॉ. रुपाली मानमोडे यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यावेळी म्हणाल्या की, सशस्त्र सैना दलाचे जवान व अधिकारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अहोरात्र देशाच्या सीमांचे रक्षण करत असतात. त्यामुळेचे आपण येथे सुरक्षित व शांतते जीवन जगतो. सशस्त्र सैना दलाचे जवान व अधिकारी आपल्या जीवाची आणि आपल्या कुटूंबीयांची पर्वा न करता देश आणि आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी सीमेवर सदैव तैनात असतात. देशाच्या रक्षणाची भूमिका बजावत असताना आपले जवान सैनिक सण, समारंभ, कार्यक्रम यांचा विचारही न करता ते सतत देशसेवा करत असतात. अशा लष्करी अधिकारी व जवानांची आणि त्यांच्या कुटूंबियाची काळजी घेणे ही आपणां सर्वांची नैतीक जबाबदारी आहे. या जबाबदारीच्या भावनेतून सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन करण्याच्या सत्कार्याला मदत करणे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे ही श्रीमती मित्तल यांनी यावेळी यावेळी सांगितलते.

मान्यवरांच्या हस्ते यावेळी वीर माता-पिता, वीर पत्नी, गुणवंत विद्यार्थी तसेच ध्वज दिन निधीचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या विभाग प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रारंभी सशस्त्र सेनेचे प्रतिक असलेले छोटे ध्वज वितरित करुन निधी संकलनाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी प्रास्ताविकात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वॉड्रन लिडर डॉ. रुपाली मानमोडे म्हणाल्या की, सन 2024 करीता 99 लाख 25 हजार रुपये निधी संकलन झाला असून, 299 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. तर सन 2025 करीता 46 लाख 50 हजाराचे उद्दिष्ट असल्याची माहिती दिली. कार्यक्रमाची सुरुवात शहिद जवानांना श्रध्दांजली वाहुन करण्यात आली तर कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला.

                                   -*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment