जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या
बैठकीचे आयोजन
जालना दि. 4 (जिमाका) :- जिल्हाधिकारी
आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि.8 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी
कार्यालयातील सभागृहात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचे आयोजन
करण्यात आले आहे. या बैठकीला समितीवर नियुक्त शासकीय सदस्य, अशासकीय सदस्यांनी
वेळेवर उपस्थित रहावे. तसेच सर्वसामान्य नागरिकांचे ग्राहक हितासंबंधीत
तक्रार असल्यास सदर बैठकीच्या दिवशी उपस्थित राहून आपला लेखी स्वरुपाचा अर्ज सादर
करावा. तसेच नागरिकांना ग्राहक या
संबंधाने काही अडचणी असल्यास त्याबाबत जालना जिल्ह्याचे संकेतस्थळ jalna.nic.in
यावर ग्राहकांच्या तक्रारीसाठी पोर्टल उपलब्ध करुन दिलेले असून नागरिकांनी
त्यांच्या समस्या या पोर्टलच्या माध्यमातून सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा पुरवठा
अधिकारी तथा जालना संरक्षण परिषदेचे सदस्य सचिव सविता चौधर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले
आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment