जिल्ह्यातील रुग्णांनी आता घर बसल्या
मोफत बाह्य रुग्ण सेवेचा लाभ घ्यावा
जालना, दि.24 (जिमाका) :- ई-संजीवनी ओपीडी अंतर्गत आपल्या
मोबाईलद्वारे ऑनलाईन घर बसल्या मोफत बाह्य रुग्ण सेवेचा तज्ज्ञाकडुन आरोग्य सेवाचा
लाभ घ्यावा. ही सुविधा आपणास सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते दुपारी 1 व दुपारी 1.45 ते 5 वाजेपर्यंत ऑनलाईन उपलब्ध राहणार आहे.
जिल्हा रुग्णालय जालना येथे आयुष्यमान आरोग्य मंदीर टेली
कन्सल्टेशन हब कार्यरत आहे. येथे 3 विशेषज्ञ व 2 वैद्यकिय अधिकारी कार्यरत आहे. यासाठी
https://esanjeevani.mohfw.gov.in/#/
किंवा क्यु आर कोड स्कॅन करावा. ई-संजीवनी ओपीडी अंतर्गत आपल्या मोबाईलच्या सहाय्याने
पुढीलप्रमाणे प्रक्रिया करावी. प्रथमत: आपला मोबाईल नंबर सत्यापित (व्हेरिफाय) करा.
नोंदणी झाल्यानंतर टोकन जनरेट करा. नोटीफिकेशन मिळाल्यानंतर लॉग इन करा. तुमचा नंबर
येईपर्यंत वाट पहावी व त्यानंतर डॉक्टरांशी सल्ला घ्यावा. ई-प्रिस्क्रीप्शन डाऊनलोड
करा. अशाप्रकारे आपणास घर बसल्या रुग्ण सेवेचा लाभ घेता येईल. असे जिल्हा आरोग्य अधिकारी,
जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment