Monday, 1 December 2025

2 डिसेंबर भोपाळ दुर्घटना दिन/राष्ट्रीय प्रदुषण प्रतिबंध दिन जालना दि.1 (जिमाका) :- दरवर्षी २ डिसेंबर रोजी भोपाळ दुर्घटना दिन/राष्ट्रीय प्रदुषण प्रतिबंध दिन असतो. या अनुषगांने प्रदुषण प्रतिबंध उपाययोजना बाबत जनजागृती माहिती देण्यात येते. भोपाळ दुर्घटनाचा परिणाम आपल्या सर्वांना ज्ञातच आहे. युनियन कार्बाइड (इंडिया) लिमिटेड या कंपनीच्या टॅंकमधुन अत्यंत विषारी असा पेस्टिसाईड मिथाईल आयसोसायनाईट वायुच्या ४० टन गळतीमुळे ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत जवळपास २०,००० लोकांचा मृत्यू झाला तसेच ५००००० पेक्षा जास्त जखमी अथवा अपंग झाले. प्रदुषण नियंत्रणाबाबतच्या नियमांना प्रसिध्दी देणे व नियमांची अंमलबजावणी करणे. स्वच्छ औद्योगिक प्रक्रियांना प्रोत्साहन देणे. कारखान्यातुन निघणारे सांडपाणी नदीमध्ये न सोडणे. प्रदुषणाच्या दुष्परिणामाबाबत जागरुकता वाढविणे. प्रदुषण दिसुन आल्यास तात्काळ कळविणे. प्रदुषणाचे संकट संपुर्ण जगामध्ये आहे. ध्वनी, हवा, जल प्रदुषण कसे प्रतिबंध करता येईल यावर उपाययोजना करण्यासाठी ०२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय प्रदुषण प्रतिबंध दिन साजरा करण्यांत येतो. प्रदुषणापासुन मुक्ती मिळविण्यासाठीच्या उपायांवर चर्चा करणे. प्रदुषणाचा धोका कमी करणे याकरिता जनतेमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. प्रदुषण होणार नाही याची दक्षता घेऊ या. असे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. -*-*-*-*-

 

2 डिसेंबर भोपाळ दुर्घटना दिन/राष्ट्रीय प्रदुषण प्रतिबंध दिन

 

 

जालना दि.1 (जिमाका) :-  दरवर्षी २ डिसेंबर रोजी भोपाळ दुर्घटना दिन/राष्ट्रीय प्रदुषण प्रतिबंध दिन असतो. या अनुषगांने प्रदुषण प्रतिबंध उपाययोजना बाबत जनजागृती माहिती देण्यात येते. भोपाळ दुर्घटनाचा परिणाम आपल्या सर्वांना ज्ञातच आहे. युनियन कार्बाइड (इंडिया) लिमिटेड या कंपनीच्या टॅंकमधुन अत्यंत विषारी असा पेस्टिसाईड मिथाईल आयसोसायनाईट वायुच्या ४० टन गळतीमुळे ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत जवळपास २०,००० लोकांचा मृत्यू झाला तसेच ५००००० पेक्षा जास्त जखमी अथवा अपंग झाले. प्रदुषण नियंत्रणाबाबतच्या नियमांना प्रसिध्दी देणे व नियमांची अंमलबजावणी करणे. स्वच्छ औद्योगिक प्रक्रियांना प्रोत्साहन देणे. कारखान्यातुन निघणारे सांडपाणी नदीमध्ये न सोडणे. प्रदुषणाच्या दुष्परिणामाबाबत जागरुकता वाढविणे. प्रदुषण दिसुन आल्यास तात्काळ कळविणे. प्रदुषणाचे संकट संपुर्ण जगामध्ये आहे. ध्वनी, हवा, जल प्रदुषण कसे प्रतिबंध करता येईल यावर उपाययोजना करण्यासाठी ०२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय प्रदुषण प्रतिबंध दिन साजरा करण्यांत येतो. प्रदुषणापासुन मुक्ती मिळविण्यासाठीच्या उपायांवर चर्चा करणे. प्रदुषणाचा धोका कमी करणे याकरिता जनतेमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. प्रदुषण होणार नाही याची दक्षता घेऊ या. असे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment