जलव्यवस्थापन कृती
पंधरवडा- 2025
जालना, दि. 23 (जिमाका) :- "जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025" अंतर्गत
दि. 23 एप्रिल 2025 रोजी बदनापूर येथील कृषी विज्ञान केंद्रात "विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र आणि सेवाभावी
संस्थेच्या संयुक्त विद्यमाने संवाद व कृती कार्यक्रम हा उपक्रम राबविण्यात आला.
जलसंपदा विभाग व
कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमासाठी
कार्यकारी अभियंता रोहित देशमुख, कार्यकारी
अभियंता सुरेखा कोरके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, उपविभागीय कृषी
अधिकारी प्रशांत पवार व जलसंपदा विभागाचे सर्व उपविभागीय अधिकारी समवेत सर्व अधिकारी
कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमास प्रमुख
वक्ते म्हणून डॉ. एस. बी. पवार व डॉ. डी. बी. कच्छवे लाभले. डॉ. एस. बी. पवार यांनी
"विविध पिकांतील पाण्याचे व्यवस्थापन" तसेच डॉ. डी. बी. कच्छवे यांनी
"दुष्काळी परिस्थितीत शेतीतील करावयाचे नियोजन" या विषयावर सर्व जलसंपदा
व कृषी विभागातील अभियंता, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी व सेवाभावी संस्थेला मार्गदर्शन
केले.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment