Tuesday, 1 April 2025

जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट; सोसाट्याचा वारा, पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

जालना, दि.1 (जिमाका) :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांच्या सूचनेनुसार जालना जिल्यालन त दि. 1 ते 2 एप्रिल 2025 या कालावधीत ऑरेंज अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्या् कडकडाटासह, सोसाट्याचा वारा (ताशी 50-60 कि.मी.प्र.ता. वेगाने) व गारपीट होण्याजची तर 3 एप्रिल रोजी यलो अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह, सोसाट्याचा वारा (ताशी 40-50 कि.मी.प्र.ता. वेगाने) हलक्या2 ते मध्यम स्व रुपाच्या पावसाची शक्यठता वर्तवली आहे. तसेच दि. 4 एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी हलक्याक ते मध्यम स्व रुपाच्याक पावसाची शक्याता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी वादळी वारे, विजेपासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती दक्षता बाळगावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हाज आपत्ती व्यववस्थाषपन प्राधिकरणाचे मुख्य् कार्यकारी अधिकारी गणेश महाडिक यांनी केले आहे. मेघगर्जनेच्या वेळी, विज चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या वा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व विज चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांच्यापासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विद्युतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मरजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या, लोंबणाऱ्या तारांपासून दूर रहावे. वीज चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमिनीशी कमीतकमी संपर्क असावा. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर या मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. आपत्कालीन परिस्थितीत जिल्हासधिकारी कार्यालयातील जिल्हाा नियंत्रण कक्ष ०२४८२-२२३१३२ वर तसेच नजीकच्या तहसील कार्यालयात, पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. -*-*-*-*-

No comments:

Post a Comment