जालना, जिमाका, दि.29 : उच्च न्यायालय, मुंबई व मा. महाराष्ट्र राज्य
विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार दिनांक 10 मे, 2025 रोजी जिल्हा
व सत्र न्यायालय, जालना येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या लोक अदालतीचा जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा या
उद्देशाने लोक अदालत बाबतची माहिती व प्रसिध्दी घरा-घरा पर्यंत पोहचावी या
उद्देशाने व लोकांनी जास्तीत जास्त प्रकरणे लोक न्यायालयाच्या माध्यमातून निकाली
निघावे या हेतुन राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
लोक
अदालतीमध्ये आपली जास्तीत जास्त प्रकरणे ठेवावी यासाठी विधिज्ञ, पक्षकार व
शासनाच्या विविध विभागांनी/अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन प्रमुख जिल्हा व
सत्र न्यायाधीश, जालना वर्षा एम. मोहिते व सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,
जालना प्रणिता पी. भारसाकडे-वाघ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment