Friday, 11 April 2025

जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

 




    जालना दि. 11 (जिमाका) :-  थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

    यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार , उपजिल्हाधिकारी नम्रमा चाटे, नायब तहसिलदार तुषार निकम, नायब तहसिलदार सतिष तायडे, सहायक महसुल अधिकारी दिपाली राऊत, सहायक महसुल अधिकारी अतुल केदार तसेच प्रशासकीय इमारती मधील विविध कार्यालयाचे अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment