Wednesday, 16 April 2025

गुण नियंत्रण व सिंचन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण संपन्न

 


        जालना, दि. 16 (जिमाका) :- जलव्यवस्थापन कृती पंधरवडा- 2025 निमित्ताने जलसंपदा विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथील महसूल सभागृहात जलसंपदा विभागातील अभियंत्याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सकाळच्या सत्रात अभियंत्यांचे गुणनियंत्रणाबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.  प्रशिक्षणास प्रमुख पाहुणे कार्यकारी अभियंता रोहित देशमुख, कार्यक्रमाच्या अध्यक्षा अभियंता सुरेखा कोरके उपस्थित होते. तर  प्रमुख वक्ते म्हणून अभियंता सतीश कोलते यांची उपस्थिती होती. दुपारच्या सत्रात सिंचन व्यवस्थापनबाबत प्रशिक्षण देण्यात आले.  प्रशिक्षण आर.आर.कल्याणकर (सेवानिवृत्त) यांनी सिंचन व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण दिले. यावेळी जलसंपदा विभागातील अभियंत्याची उपस्थिती होती.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment