जालना, दि. 23 (जिमाका) :- जालना जिल्ह्यामध्ये खेळाचा प्रचार व प्रसार होणेसाठी खेळाडूंचा
जास्तीत जास्त सहभाग व संघाची संख्या वाढवणे यावर लक्ष केंद्रीत करून चांगले खेळाडू
तयार होण्यासाठी 8 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यासाठी जिल्हास्तरवर उन्हाळी
प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन खेळाडूंच्या शारीरिक क्षमता खेळांचे प्राथमिक कौशल्य
विकास व खेळाची आवड निर्माण करण्यासाठी शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.
खेळांचे प्राथमिक कौशल्य विकास व नवीन विद्यार्थी खेळाडूंना खेळाची आवड
निर्माण होण्यासाठी प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन जिल्हा क्रीडा
अधिकारी जालना यांच्या मार्फत खालील ठिकाणी दि. 1
ते 15 मे 2025 या
कालावधीत सकाळी आणि सांयकाळी आयोजन करण्यात येत आहे. सदरील प्रशिक्षण शिबीरासाठी खेळ प्रमुख
यांच्याकडे नाव नोंदविणे आवश्यक आहे.
शिबीरात सहभागी होणाऱ्या सर्व खेळांडुना जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्फत
प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रशिक्षण शिबीरात क्रीडा कार्यालयाचे राज्य़
क्रीडा मार्गदर्शक व विविध खेळ संघटनांचे उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकामार्फत
मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिरात सहभागासाठी खेळाडूंनी नाव नोंदणी करावी.
नाव नोंदणीसाठी
प्रमोद खरात
7972899348, एकनाथ सुरूशे 9011854192, विजय गाडेकर
9271783313, नागेश वऱ्हाडे 9529133459, विकास काळे 7350590072, अमोल
काटकर 9923820752 यांच्याशी संपर्क साधावा. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment