जालना दि.30(जिमाका)
: अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील
नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांना 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची
उपसाधने 90 टक्के अनुदानावर वाटप करण्यात येतात. सन 2024-25 या आर्थिक वर्षातील
सदर योजनेतंर्गत एकुण 25 मिनी ट्रॅक्टर चे उद्दिष्ट प्राप्त झाले आहेत.
त्यानुषंगाने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील स्वयंसहाय्यता बचतगटांकडुन अर्ज
मागविण्यात येणार असून, पात्र बचतगटांपैकी मंजुर उद्दिष्टाच्या अनुषंगाने 25
बचतगटांची निवड करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने बचतगटांची लॉटरी पध्दतीने निवड
करण्यात येणार आहे. बचतगटांची अंतिम पात्र व अपात्र यादी कार्यालयाच्या सुचना फलकावर
डकविण्यात आली आहे.
तरी सर्व
बचतगटांना दिनांक 2 मे 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सांस्कृतीक सभागृहामध्ये पात्र
बचतगटातील अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांनी लॉटरी पध्दतीने स्वयंसहाय्यता
बचतगटांची निवड करण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण
यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
****
No comments:
Post a Comment