Tuesday, 25 November 2025

इस्राईल देशात बांधकाम नूतनीकरण क्षेत्रात रोजगाराची संधी

 


            जालना, दि. 25  (जिमाका) :-  आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासह बांधकाम, आरोग्य व इतर क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमापैकी एक असलेल्या इस्राईल आणि भारत यांच्यातील कराराद्वारे रोजगाराच्या संधी निर्माण करणे या अंतर्गत इस्राईल देशात प्लास्टरिंग काम 1000 जागा, सिरेमिक टायलींग 1000जागा, ड्रायवॉल वर्कर 300 जागामिस्त्रीकामासाठी 300 जागा असे एकूण 2600 कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आलेली आहे.

            यासाठी उमेदवार 25 ते 50 वयोगटातील दहावी पास पात्रताधारक उमेदवारांना इस्राईलमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. यासाठी बांधकाम क्षेत्रात काम करण्यास इच्छुक उमेदवारांनी https://tinyurl.com/6dp6cbs6 या गूगल फॉर्म लिंकवर उमेदवारांनी नोंदणी करावी. यासाठी अधिक सहाय्य व माहीतीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, जालना या कार्यालयाशी प्रत्यक्ष 02482-299033 या दूरध्वनीवर संपर्क साधावा किंवा कार्यालयाच्या jalnarojgar@gmail.com या ई-मेलवर संपर्क करावा, असे सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले केले.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment