जालना, दि.7
(जिमाका) :- वंदे मातरम या गीतास आज (दि.7)
रोजी 150 वर्षे पुर्ण होत आहेत. सर्व जनमानसात देशभावना जागृत होण्यासाठी या गीताने
महत्वाची भुमिका बजावलेली आहे. त्यानिमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालयात वंदे मातरम
या गीताचे सामुहिक गायन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांच्यासह शासनाच्या सर्व विभागातील शासकीय
व निमशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची वंदे मातरम या गीताच्या सामुहिक गान प्रसंगी उपस्थिती
होती.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment