स्वातंत्र सैनिक निवृत्तीवेतन धारकांना आवाहन
जालना, दि. 27 (जिमाका) :- स्वातंत्र सैनिक निवृत्तीवेतन घेणारे सर्व स्वातंत्र सैनिक, स्वातंत्र
सैनिक वारस पत्नी निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचे प्रमाणपत्र तहसील कार्यालय, जालना
येथे सादर करणे आवश्यक आहे. हयात प्रमाणपत्र विलंबाने प्राप्त झाल्यास
निवृत्तीवेतन प्रदान करण्यास विलंब होईल. तरी जालना व बदनापूर तालुक्यातील स्वातंत्र सैनिक निवृत्तीवेतन घेणाऱ्या व्यक्तींनी हयातीचे प्रामणपत्र दि.31
डिसेंबर 2025 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन तहसीलदार छाया पवार यांनी केले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment