Thursday, 6 November 2025

वंदे मातरम गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त होणार सामुहिक गायन

 


 

जालना, दि.6 (जिमाका) :-   वंदे मातरम या गीतास दि.7 नोव्हेंबर 2025 रोजी 150 वर्षे पुर्ण होत आहेत. तरी सर्व तालुक्यामध्ये वंदे मातरम या गीताचे सामुहीक गायन करण्यात येणार आहे.  सर्व जनमानसात देशभावना जागृत होण्यासाठी या गीताने महत्वाची भुमिका बजावलेली आहे. तरी कार्यक्रम यशस्वीतेसाठी शासनाच्या सर्व विभागातील शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी वंदे मातरम या गीताच्या सामुहिक गान प्रसंगी तालुक्याच्या ठिकाणी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. असे निर्देश उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी पत्रान्वये जिल्ह्यातील सर्व कार्यालयांना दिले आहेत.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment