जालना,
दि. 26 (जिमाका) :- भारतीय संविधानाला 75 वर्ष पुर्ण
झाल्यानिमित्ताने संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान या कार्यक्रमाचे औचित्य
साधुन जालना जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती मार्फत दि. 26 नोव्हेंबर 2025
ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत समिती कार्यालयात विशेष मोहिम शिबिर राबविण्यात
येत आहे. समिती कार्यालयात दररोज कार्यालयीन वेळेत अधिकारी व कर्मचारी तसेच
अर्जदार, पालक यांच्या उपस्थितीत त्यांना संविधानाचे वाचन,भारतीय संविधानाचे महत्व
याबाबत माहिती देण्यात येणार आहे. तसेच समितीने वैध करण्यात आलेल्या प्रकरणात
अर्जदार यांना ऑनलाईन प्रक्रियेव्दारे जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात
येणार आहे.असे जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्य
संगीता मकरंद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment