Thursday, 5 March 2026

सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांचा दौरा जालना, दि.5 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार दि.8 मार्च 2026 रोजी नागपूर येथून जालना येथे सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृहात आगमन व राखीव. सोमवार दि.9 मार्च 2026 रोजी दुपारी 12 ते 12.30 वाजेपर्यंत सफाई कर्मचारी संघटनेसोबत बैठकीस उपस्थिती. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध कर णे व त्यांचे पुर्नवसन करणेबाबतचा अधिनियम 2013ची अंमलबजावणीबाबत तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडीअडचणी निवारणासाठी केलेल्या उपाययोजनाबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतील. दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत महानगरपालिका आयुक्त यांच्यासमवेत नॅशनल ॲक्शन फॉन मॅकनाईज्ड सॅनिटेशन इकोसिस्टमची जालना जिल्ह्यातील अंमलबजावणी तसेच मा. उच्च न्यायालयात दाखल ‍रिट याचिकानूसार लाड पागे समितीच्या शिफारसीप्रमाणे प्रलंबित प्रकरणे व त्याबाबत कर ण्यात आलेली कारवाई, सफा ई कर्मचाऱ्यांच्या समस्या व त्यांचे निराकरण करण्यासाठी उपाययोजनाबाबचा आढावा घेतील. त्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन. दुपारी 4 नंतर शासकीय विश्रामगृह जालन येथे राखीव. -*-*-*-*-

 

सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष

शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांचा दौरा

 

जालना, दि.5 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार दि.8 मार्च 2026 रोजी नागपूर येथून जालना येथे सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृहात आगमन व राखीव.

सोमवार दि.9 मार्च 2026 रोजी दुपारी 12 ते 12.30 वाजेपर्यंत सफाई कर्मचारी संघटनेसोबत बैठकीस उपस्थिती.  दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात हाताने मैला उचलणाऱ्या   सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध कर णे व त्यांचे पुर्नवसन करणेबाबतचा अधिनियम 2013ची अंमलबजावणीबाबत तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडीअडचणी निवारणासाठी केलेल्या उपाययोजनाबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतील.   दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत महानगरपालिका आयुक्त यांच्यासमवेत नॅशनल ॲक्शन फॉन मॅकनाईज्ड सॅनिटेशन इकोसिस्टमची जालना जिल्ह्यातील अंमलबजावणी तसेच मा. उच्च न्यायालयात दाखल ‍रिट याचिकानूसार लाड पागे समितीच्या शिफारसीप्रमाणे प्रलंबित प्रकरणे व त्याबाबत कर ण्यात आलेली कारवाई, सफा ई कर्मचाऱ्यांच्या समस्या व त्यांचे निराकरण करण्यासाठी उपाययोजनाबाबचा आढावा घेतील. त्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन. दुपारी 4 नंतर शासकीय विश्रामगृह जालन येथे राखीव.

-*-*-*-*-

समाज कल्याणच्या पुरस्कारासाठी अर्ज करावेत जालना, दि.5 (जिमाका) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत समाजकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था आणि समाजसेवकांना दरवर्षी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. सन 2024-25 आणि 2025-26 या आर्थिक वर्षांतील पुरस्कारांसाठी इच्छुक पात्र संस्था तसेच उमेदवारांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जालना समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजू एडके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. समाजकल्याण क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था आणि वैयक्तिक स्तरावर उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक यामध्ये सहभागी होऊ शकतात. दोन्ही वर्षांच्या (2024-25 व 2025-26) पुरस्कारांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2026 अशी निश्चित करण्यात आली आहे. पुरस्कारासाठी कामाची गणना 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीतील कामगिरीवर आधारित असेल. वर्षासाठी आणि ज्या विशिष्ट पुरस्कारासाठी अर्ज केला जात आहे, त्या पुरस्कारासाठी शासनाने विहित केलेल्या सर्व अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्यक आहे. -*-*-*-*-

 

समाज कल्याणच्या पुरस्कारासाठी अर्ज करावेत

 

जालना, दि.5 (जिमाका) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत समाजकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था आणि समाजसेवकांना दरवर्षी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. सन 2024-25 आणि 2025-26 या आर्थिक वर्षांतील पुरस्कारांसाठी इच्छुक पात्र संस्था तसेच उमेदवारांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जालना समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजू एडके  यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

समाजकल्याण क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था आणि वैयक्तिक स्तरावर उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक यामध्ये सहभागी होऊ शकतात. दोन्ही वर्षांच्या (2024-25 व 2025-26) पुरस्कारांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2026 अशी निश्चित करण्यात आली आहे. पुरस्कारासाठी कामाची गणना 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीतील कामगिरीवर आधारित असेल. वर्षासाठी आणि ज्या विशिष्ट पुरस्कारासाठी अर्ज केला जात आहे, त्या पुरस्कारासाठी शासनाने विहित केलेल्या सर्व अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

-*-*-*-*-

जालना जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन जालना, दि.5 (जिमाका) :- आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जालना जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याची अफवा काही ठिकाणी पसरत आहे. या अफवेमुळे जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी इंधन भरण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, जालना जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा साठा पुरेसा असून इंधन पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे, असे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाने दिले आहे. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर नियमितपणे पुरवठा सुरू आहे. नागरिकांनी घाबरून जाऊन पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये. अतिरिक्त इंधन साठा करण्याची कोणतीही गरज नसून नागरिकांनी संयम पाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप कंपन्यांच्या विक्री अधिकारी आणि प्रतिनिधींना इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत आवश्यक सूचना प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत. पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. इंधन तुटवड्याबाबत चुकीची माहिती किंवा अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी कोणत्याही अनाधिकृत माहितीवर विश्वास न ठेवता, अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे जिल्हा पुरवठा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. -*-*-*-*-

 

जालना जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा;

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 

जालना, दि.5 (जिमाका) :- आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जालना जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याची अफवा काही ठिकाणी पसरत आहे. या अफवेमुळे जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी इंधन भरण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, जालना जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा साठा पुरेसा असून इंधन पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे, असे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाने दिले आहे.

जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर नियमितपणे पुरवठा सुरू आहे. नागरिकांनी घाबरून जाऊन पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये. अतिरिक्त इंधन साठा करण्याची कोणतीही गरज नसून नागरिकांनी संयम पाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप कंपन्यांच्या विक्री अधिकारी आणि प्रतिनिधींना इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत आवश्यक सूचना प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत. पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.  इंधन तुटवड्याबाबत चुकीची माहिती  किंवा  अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी कोणत्याही अनाधिकृत माहितीवर विश्वास न ठेवता, अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे जिल्हा पुरवठा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या प्रचार-प्रसिध्दी चित्ररथाचा हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ

 


• जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते प्रसिध्दी मोहिमेची सुरुवात

 

जालना,दि.5(जिमाका): जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-2026 अंतर्गंत विविध विभागाच्या कल्याणकारी योजनांची तसेच जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) सन 2025-2026 अंतर्गंत सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती व जनजागृती होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय जालना यांच्या वतीने आयोजित डिजिटल चित्ररथाला आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रचार-प्रसिद्धी मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. हे चित्ररथ जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात जाऊन प्रचार-प्रसिध्दी करणार असुन, यामुळे नागरिकांना तसेच लाभार्थ्यांना या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळणार असुन, या योजनांचा लाभ घेण्यास देखील मदत होणार आहे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत मुख्यमंत्री बळीराजा शेत/पांदण रस्ते योजना, पीएम सुर्यघर मुफ्त बीजली योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0, बालविवाह प्रतिबंध कायदा:2006, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय या योजनांचा समावेश आहे. तसेच जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) अंतर्गत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, अनुसूचित जातीतील लाभार्थींना शेळ्या/मेढ्यांचे गट व दुभत्या जनावरांच्या गटाचा पुरवठा करणे, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, सौर उर्जा संयंत्र बसविणे, ग्रामीण भागातील महिलांना विविध साहित्य पुरविणे या योजनांचा समावेश आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना (नवीन विहिर व जुनी विहिर दुरुस्ती), अनुसूचित जातीतील लाभार्थींना शेळ्या मेढ्यांचे गट व दुभत्या जनवरांच्या गटाचा पुरवठा करणे, रमाई आवास योजना (शहरी व ग्रामीण) आणि अनुसूचित जाती व नवबौध्द मुलां-मुलींकरीता तालुकास्तरावर 100 शासकीय निवासी शाळा या योजनांवर आधारित भित्तीपत्रिकांचे देखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. तसेच या डिजिटल चित्ररथाद्वारे जिल्हा माहिती कार्यालय, जालना यांनी तयार केलेल्या बालविवाह मुक्त जालना, वन स्टॉप सखी सेंटर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना आणि अनुसूचित जातीतील नागरिकांसाठी गटई स्टॉल योजना या योजनावर आधारित लघु माहितीपट देखील दाखवून प्रचार प्रसिध्दी करण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी चित्ररथ, लघु माहितीपट आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सूचित कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता पवार, समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ निरिक्षक गणेश अंभोरे, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, साक्षी उगले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन इंगळे, संरक्षण अधिकारी श्री. कुलकर्णी, संतोष मुसळे, उपसंपादक (अ.का.) मिलिंद तुपसमिंद्रे, श्रीमती पुष्पा धनाईत, प्रतिभा इंगळे, विष्णु जायभाये, संतोष पाखरे, महिला बाल विकास विभाग आणि सखी वन स्टॉप सेंटरचे कर्मचारी आदींची उपस्थिती होती.                  

                            *****

 

 

 

 

 

Tuesday, 3 March 2026

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम जालना, दि.4 (जिमाका) :- राजस्थान राज्याचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे शुक्रवार दि.6 मार्च 2026 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दि.6 मार्च 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून दुपारी 2.55 वाजता जेईएस महाविद्यालय, जालना येथे आगमन व राखीव. दुपारी 3 ते 4 या वेळेत जालना ज्येष्ठ नागरिक मंचाकडून आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 4.35 वाजता जालना येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील. -*-*-*-*-

 

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा

 जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

 

जालना, दि.4 (जिमाका) :- राजस्थान राज्याचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे शुक्रवार दि.6 मार्च 2026 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दि.6 मार्च 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून दुपारी 2.55  वाजता जेईएस महाविद्यालय, जालना येथे आगमन व राखीव. दुपारी 3 ते 4 या वेळेत जालना ज्येष्ठ नागरिक मंचाकडून आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 4.35 वाजता जालना येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-

Monday, 2 March 2026

अभियांत्रिकी व वैद्यकीय परीक्षांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत कोचिंगची संधी

 


 

जालना, दि.2 (जिमाका):-  छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर आणि बीड जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि सीईटी या परीक्षांचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. शासकीय वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात आदिवासी विद्यार्थ्यांचा टक्का वाढवण्यासाठी छत्रपती  संभाजीनगर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांनी हे पाऊल उचलले आहे.

इयत्ता अकरावी आणि बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता नामवंत खासगी संस्थांमार्फत अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि सीईटी या परीक्षांचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे. शासकीय आश्रमशाळा, अनुदानित शाळा, EMRS आणि जिल्हा परिषद शाळांमधील पात्र विद्यार्थ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज तातडीने भरणे आवश्यक आहे. हे अर्ज प्रकल्प कार्यालय किंवा संबंधित मुख्याध्यापकांकडे मोफत उपलब्ध असून ते भरून तात्काळ सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

Friday, 27 February 2026

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न

 


 

जालना, दि.27 (जिमाका):-  जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवार दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रगती सभागृहात पार पडली. सकाळी 11 वाजता आयोजित केलेल्या या बैठकीत ग्राहकांच्या विविध तक्रारी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर आणि अशासकीय सदस्य सतिश पंच यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी जिल्ह्यातील बाजारपेठांमधील वाढती भेसळ, वजन-मापांमधील तफावत आणि सेवांमधील त्रुटींबाबत सदस्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. अशासकीय सदस्यांनी केलेल्या सुचनांवर अंमलबजावणी करावी तसेच ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी मिसाळ यांनी यावेळी दिले. बैठकीला समितीचे इतर शासकीय व अशासकीय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्राहकांनी आपल्या तक्रारींसाठी पुढे यावे, असे आवाहनही याप्रसंगी करण्यात आले.

-*-*-*-*-

वृत्त क्र.                                                                         दि. 27 फेब्रुवारी, 2026

समाज कल्याण विभागाच्या

गटई स्टॉल योजनेच्या निकषात सुधारणा

 

जालना, दि.27 (जिमाका):-  अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील बांधवांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी राज्य शासनाने गटई स्टॉल योजनेच्या व्याप्तीमध्ये मोठे बदल केले असून निकषांमध्ये सुधारणा केली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 28 जानेवारी 2026 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार आता ही योजना अधिक व्यापक आणि सुटसुटीत करण्यात आली आहे. पूर्वी ही योजना संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत राबविली जात होती. मात्र नव्या निर्णयानुसार आता या योजनेची संपूर्ण अंमलबजावणी आयुक्त, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत केली जाणार आहे.

चर्मकार, ढोर, होलार, मोची व इतर पोटजातींमधील गरजू कामगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 40  हजार रुपयांवरून 80 हजार रुपये करण्यात आली आहे. तर शहरी भागासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 50 हजार रुपयांवरून 1 लाख रुपये करण्यात आली आहे. सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया एप्रिल 2026 नंतर सुरू होणार आहे. याबाबतची अधिकृत जाहिरात आणि प्रसिद्धी समाजकल्याण विभागामार्फत लवकरच देण्यात येईल. महानगरपालिका, नगरपालिका, छावणी क्षेत्र आणि ग्रामपंचायत क्षेत्रातील पात्र उमेदवारांना 100  टक्के शासकीय अनुदानावर हे स्टॉल दिले जाणार आहेत. असे सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र.                                                                         दि. 27 फेब्रुवारी, 2026

 

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या

शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रकिया सुरु

 

जालना, दि.27 (जिमाका):-  इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्याच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र विद्यार्थ्यांना दि.25 फेब्रुवारी ते 10 मार्च 2026 या कालावधीत अर्ज सादर करता येणार आहेत.  

या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शहरात उच्च शिक्षणासाठी निवासाची सोय उपलब्ध करून देणे हा आहे. जालना महापालिका हद्दीपासून 10 कि.मी. अंतराच्या परिसरातील महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करावा तर इतर तालुक्याच्या ठिकाणावरील विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना यांसारख्या पर्यायी योजनेसाठी अर्ज करावेत. असे आवाहन, सहायक लेखाधिकारी, सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र.                                                                         दि. 27 फेब्रुवारी, 2026

 

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर अभियानातंर्गत बैठक

अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वयाने कामे करावीत

- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

 

  • जिल्ह्यात 7 मार्च ते 15 मे 2026 या कालावधीत

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान

 

जालना, दि.27 (जिमाका):-  जालना जिल्ह्यात दि.7 मार्च ते 15 मे 2026 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर आयोजित करण्यात आले आहेत. ही शिबिरे हे प्रत्येक तालुक्यातील महसूल मंडळ, नगर परिषद व नगर पंचायतीस्तरावर घेतली जाणार आहेत. तरी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि गतिमान करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वयाने कामे करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर अभियान टप्पा-1 अंतर्गत व्हिडीओ कॉन्फर्सिंगद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी मनिषा देशपांडे, सहायक जिल्हाधिकारी बी.सर्वनन यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान (टप्पा-1) अंतर्गत समाधान शिबिरांच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी नुकताच घेतला आहे. या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित कामे आणि नागरिकांच्या तक्रारी एकाच ठिकाणी निकाली काढणे हे आहे. तरी अधिकाधिक नागरिकांना शिबिराचा लाभ घेता यावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीराची जनजागृती सर्व माध्यामाद्वारे करण्यात यावी. तसेच छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीराचे सुक्ष्म नियोजन करावे, अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

समाधान शिबिरात भोगवटदार वर्ग-2 ते वर्ग-1 परावर्तन पुर्ण करुन सातबारा अद्ययावत देणे, जीवंत सातबारा अंतर्गत प्रलंबित नोंदी दुरुस्त करणे, सामाजिक योजनांचे अर्ज मंजूर करुन शिबिरात वितरण करणे, पाणंद रस्ते व सर्वांसाठी घरे प्रकरणे निकाली काढुन आदेश/पट्टे वाटप करणे, प्रलंबित व ‍विवादग्रस्त फेरफार निकाली काढणे, अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्क सुरु करणे, अकृषिक सुधारणाकरणेबाबत मार्गदर्शन करणे, लोकसेवा हक्क कायद्यानुसार प्रमाणपत्र अर्ज स्विकारणे व वितरण करणे, डिजीटल सातबारा, व नवीन महसूल तरतुदींची जनजागृती करणे, कमी जास्त पत्रके अद्ययावत करणे, एक खिडकी सुविधेद्वारे ई-मोजणी, ॲग्रीस्टॅक, पीएम किसान व तक्रार निवारण सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. अशी माहिती ही यावेळी देण्यात आली. या बैठकीस सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार व्हिडीओ कॉन्फर्सिंगद्वारे उपस्थित होते.

-*-*-*-*-