जालना,
दि. 17 (जिमाका) :- नोकरीच्या शोधात असलेल्या
जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय
आणि आस्थापना यांच्याकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध
करण्याच्या उद्देशाने तसेच रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. तरी
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व
उद्योजकता विभागाकडून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्र, जालना येथे बुधवार दि.19 मार्च 2025 रोजी “प्लेसमेंट ड्राईव्ह -जागेवर निवड संधीचे आयोजन सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास
रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त गणेश चिमणकर यांनी दिली आहे.
म्हस्के टेक्नॉलॉजीज प्रा.लि.जालना यांचे
आय.टी.आय कोणताही ट्रेड उत्तीर्ण करिता ऑपरेटरची 2
पदे, आय.टी.आय इलेक्ट्रिशीयन उत्तीर्ण करिता 3 पदे तसेच भूमी कॉटेक्स प्रा.लिमिटेड जालना यांची
पदवी उत्तीर्ण करिता सुपरवायझरची 3 पदे, तसेच लेखा
विषयक अनुभव असलेल्या बी.कॉम उत्तीर्ण करिता लेखापाल करिता 3
पदे, कोणतीही पदवीधर उत्तीर्ण करिता वजन काटा ऑपरेटर साठी 1
पद, आय.टी.आय उत्तीर्ण मशीन हेल्परसाठी
3
पदे, बी.एस्सी कृषी उत्तीर्णसाठी मार्केटिंग
प्रतिनिधीसाठी 4 पदे तसेच दहावी उत्तीर्णकरिता डाटा एन्ट्री
कार्यालयीन सहायक पदासाठी 1 अशी एकुण
20 रिक्तपदे प्राप्त झालेली आहेत. याकरीता नोकरी इच्छुक
पात्रता धारक उपस्थित होणाऱ्या
उमेदवारांच्या
प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवडीची संधी उपलब्ध आहे.
जालना
जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in
या वेबसाईटला भेट द्यावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम
आपली नोंदणी करावी आणि होम पेज वरील नोकरी साधक लॉगिन मधून आपल्या युजर आयडी व
पासवर्डच्या आधारे लॉग ईन करावे. त्यानंतर
डॅसबोर्ड मधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करून
जालना जिल्हा निवडून त्यातील प्लेसमेंट ड्राईव्ह-5 पर्यायाची
निवड करावी. उद्योजक, नियोक्तानिहाय त्यांच्याकडील
रिक्त पदांची माहिती घ्यावी. याप्रमाणे आवश्यक किमान पात्रता धारण करीत असल्याची
खात्री करून उपलब्ध असलेल्या रिक्त पदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंती क्रमांक
नोंदवावा आणि किमान दोन प्रतीत बायोडाटासह फोटो, शैक्षणिक व व्यावसायिक
पात्रता, इत्यादी
कागदपत्रे
कंपनींना देण्यासाठी छायाप्रती संच सोबत ठेवून बुधवार दि. 19 मार्च 2025 रोजी सकाळी 11 ते दु. 2 प्रत्यक्ष
मुलाखतीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकतामार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, प्रशासकीय इमारत, दुसरा
मजला, जालना येथे उपस्थित राहून या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावे
आणि रोजगाराच्या या पर्वणीचा लाभ घ्यावा. असेही
सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, जालना यांनी
प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment