जालना, दि. 13 (जिमाका) :- जनतेच्या तक्रारीचे
निवारण करण्यासाठी सहायक आयुक्त स्तरावर जनता
तक्रार निवारण दिन, लोकशाही दिनाच्या आयोजन करण्याबाबत आयुक्तालयाचे निर्देश आहेत. तरी समाज कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या
विविध योजनांच्या अडचणी संदर्भात तसेच या कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय वसतिगृह
किंवा शासकीय निवासी शाळेमध्ये पुरविण्यात येणाऱ्या सोई-सुविधांच्या विषयी असणाऱ्या
समस्या, तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सोमवार दि. 24 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता समाजकल्याण कार्यालय, जालना
येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी संबधितांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात घेऊन वेळेवर उपस्थित राहावे, असे
आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment