महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार
कल्याणकारी मंडळ
· विविध कल्याणकारी योजनेअंतर्गत
24 हजाराहून अधिक
बांधकाम कामगारांना 72 कोटी 43 लाख
रुपयांचे अर्थसहाय्य
जालना, दि.
25 (जिमाका) :- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जालना अंतर्गत
इमारत बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात येते. तसेच त्यांना जीवित बांधकाम कामगार
म्हणुन ओळखले जाते. याबरोबरच त्यांना विविध कल्याणकारी योजनांचा देखील लाभ अदा करण्यात
येत असतो. जालना जिल्ह्यात 99 हजार 146 कामगारांची नोंदणी व 31 हजार 826 कामगारांचे
नुतनीकरण करण्यात आले आहे. तरी जालना जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख 30 हजार 972 कामगार
नोंदीत कामगार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी
मंडळाचे जिल्हा उपकार्यकारी अधिकारी तथा सरकारी कामगार अधिकारी अमोल जाधव यांनी दिली.
सरकारी कामगार अधिकारी हे कार्यालय
जुन 1981 पासून कार्यरत असून, या कार्यालयातंर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार
कल्याणकारी मंडळ हे सन 2012 पासुन कार्यरत आहे. मंडळाचे कामकाज जुलै 2020 पासुन संपुर्ण
संगणीकृत झाले असून, मंडळाद्वारे इमारत व बांधकाम क्षेत्रातील कामगारांची ऑनलाईन प्रणालीद्वारे
नोंदणी करण्यात येते. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून
विविध योजना राबविल्या जातात.
सन 2024-25 या कालावधीत विविध कल्याणकारी
योजनेअंतर्गत 24 हजार, 454 बांधकाम कामगारांना 72 कोटी 43 लाख 35 हजार रुपयांचे अर्थसहाय्य
देण्यात आले. गृह उपयोगी साहित्य खरेदीसाठी 3 हजार रुपये अर्थसहाय्यासाठी 1 हजार
14 नोंदीत लाभार्थी कामगारांना 30 लाख 42 हजार रुपयांचे अर्थसहाय्य वितरीत करण्यात
आले. अवजारे खरेदीसाठी 5 हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात येत असून 17
हजार 599 कामगारांना 8 कोटी 79 लाख 95 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. या सर्व योजनेसाठी एकुण 48 हजार 558 लाभार्थी कामगारांना 47 कोटी
11 लाख 63 हजार 151 रुपये अर्थसहाय्यापोटी वाटप करण्यात आले आहेत.
जानेवारी 2024 पासुन बांधकाम कामगारांसाठी
गृहपयोगी वस्तु संच ही योजना सुरु करण्यात आली असून, आजपर्यंत 21 हजार 569 इतक्या नोंदीत
कामगारांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी
मंडळाने जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर ‘तालुका कामगार सुविधा केंद्र’ 1 सप्टेंबर,
2024 पासून स्थापन केले असून, त्या ठिकाणी संबंधित तालुक्यातील बांधकाम कामगारांची
नोंदणी, नुतनीकरण व लाभाचे अर्ज तपासणीची सुविधा उपलब्ध
करुन देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उपकार्यकारी अधिकारी तथा सरकारी कामगार अधिकारी
अमोल जाधव यांनी दिली.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment