जालना, दि. 19 (जिमाका) :- जिल्हा
न्यायालय जालना व सर्व तालुका न्यायालयामध्ये प्रलंबित मोटार वाहन अपघात
कायद्याअंतर्गत नुकसान भरपाईचे प्रकरणे, प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कलम
138, एन.आय. बँकेची वसुली प्रकरणे,
कौटुंबिक वादाची प्रकरणे, मजुरी संबंधीचे वादाची प्रकरणे, ॲक्टची प्रकरणे,
भुसंपादनाची प्रकरणे, इलेक्ट्रीसीटी, पाणी बिल, महसुलची प्रकरणे व इतर प्रकरणे
तसेच दावा दाखलपुर्व प्रकरणे, इत्यादी प्रकरणासाठी दि. 22 मार्च 2025 रोजी
राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले आहे. तरी सर्व संबंधितांनी या संधीचा लाभ घेवून आपली प्रकरणे
लोकअदालतमध्ये ठेवून तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन सचिव, जिल्हा विधी सेवा
प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment