जालना, दि.
25 (जिमाका) :- जालना शहरातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ
सेवानिवृत्ती वेतन योजना या लाभार्थ्यांना डी.बी.टी.मार्फत त्यांच्या खात्यावर पैसे
डिसेंबर-2024 पासुन जमा करण्यात येत आहेत. त्यासाठी लाभार्थ्यांना बँक खात्याशी आधार
क्रमांक आणि मोबाईल क्रमांक लिंक करणे आवश्यक आहे. तरी संबंधित लाभार्थ्यांनी मोबाईल
क्रमांक व आधार क्रमांक बँक खात्याला लिंक केल्याची पावती, ई-केवायसी पावती, वर्गवारी
पुराव्याची छायांकित प्रत जालना तहसील कार्यालयात
दि.31 मार्च 2025 पर्यंत जमा करावी. कागदपत्राची पुर्तता न केल्यास लाभार्थी अनुदानापासुन
वंचित राहिल्यास त्यास लाभार्थी स्वत: जबाबदार राहील, असे जालना तहसीलदार छाया पवार
यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment