जालना, दि. 6 (जिमाका) :- जिल्हास्तरीय समितीची जलयुक्त शिवार अभियान, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
2.0 व गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार तसेच नाला खोलीकरण व रुंदीकरण या योजनांची जिल्हास्तरीय
आढावा बैठक गुरुवार दि.6 मार्च 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी
डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्हास्तरीय बैठकीत शासनास गाळमुक्त
धरण, गाळयुक्त शिवार तसेच नाला खोलीकरण व रुंदीकरण या योजनेचा सुधारीत आराखडा तयार
करण्यासाठी इच्छुक असलेल्या ग्रामपंचायतींनी त्यांचे ठराव व अशासकीय संस्थांनी त्यांचे
प्रस्ताव दि.13 मार्च 2025 पर्यंत जिल्हा जलसंधारण
अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, जालना येथे सादर करावेत. मुदतीनंतर आलेल्या ठराव व
प्रस्ताव ग्राह्य धरले जाणार नाही. असा निर्णय घेण्यात आला असल्याचे जिल्हा जलसंधारण
अधिकारी तथा जिल्हास्तरीय समितीचे सदस्य् सचिव एस.एस.वाघमारे यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment