Wednesday, 12 March 2025

विवाह पुर्व समुपदेशन केंद्राचे उदघाटन संपन्न

 


 

जालना, दि. 12 (जिमाका) :-  राष्ट्रीय महिला आयोगाच्या निर्देशावरुन महिला सक्षमिकरण तसेच स्नेही कुटुंबासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दि.8 मार्च 2025 रोजी प्रशासकीय इमारतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयासमोर विवाह पुर्व समुपदेशन केंद्राचे उदघाटन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कोमल कोरे यांच्या हस्ते संपन्न झाले.

विवाहपुर्व समुपदेशन केंद्रामध्ये विवाह करु इच्छिणाऱ्या  जोडप्यांसाठी विवाह पुर्व संवाद साधण्यात येणार आहे. सुखी कौटुंबिक जीवनासाठी जोडप्यांना सक्षम बनविणे, आधुनिक काळातील नातेसंबंधातील आव्हानाबद्दल संवाद साधण्यात येईल. लग्नाअगोदर व लग्नानंतर होणारे वाद विवाद, त्यामुळे होणाऱ्या कौटुंबिक व सामाजिक अडचणींचा वेळ असतानाच निपटारा होवू शकेल. त्यामुळे परिवार विभक्त्‍ होण्यापासून मदत मिळेल, असे उदगार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कोमल कोरे यांनी यावेळी काढले. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment