Monday, 3 March 2025

जालना जिल्ह्यातील रेशीम उत्पादकासाठी बाजारपेठ खुली केल्याने रेशीम उत्पादन व उत्पादकता वाढणार-राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

 



 

    जालना,(जिमाका) दि.3: शेतकऱ्यांना पायाभूत सोयी सुविधा देवून त्यांचे बळकटीकरण करण्याचे शासनाचे प्राधान्य आहे. जालना जिल्ह्यामध्ये, परिसरातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी, रेशीम कोशांची खरेदी व विक्री करण्यासाठी खुली बाजारपेठ उभारली आहे. बाजारपेठेचे बांधकाम पूर्ण झाले असून लवकरच ही बाजारपेठ शेतकऱ्यांसाठी खुली करण्यात येईल. त्यामुळे, या भागातील रेशीम उत्पादन व उत्पादकता वाढणार असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणात केले.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment