Friday, 14 February 2025

जय छत्रपती जय शिवाजी भारत पदयात्राचे आयोजन

 


       जालना,दि.14 (जिमाका) : आयुक्त क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दि. 10 फेब्रुवारी, 2025 रोजी ऑनलाईन बैठकीत दिलेल्या सुचनानुसार दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 7.00 वाजता जय छत्रपती जय शिवाजी भारत पदयात्रा छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून (मोतीबाग) सुरुवात करुन कचेरी रोड-गांधी चमन-मंमादेवी मंदिर-पाणीवेश-काद्राबाद मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास माळा अर्पण करुन पुर्ण करण्यात येणार आहे. या पदयात्रेस जालना जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व विभागाचे विभाग प्रमुख यांची उपस्थिती राहणार आहे.

सर्व शाळा/ महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांसह एनसीसी, एनएसएस, स्काऊट/गाईडस विद्यार्थी यांना पदयात्रेस सहभागी करावेत तसेच सर्व क्रीडा संघटना पदाधिकारी व खेळाडू यांनी पदयात्रेला मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशासन, जिल्हा शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, जालना यांच्या वतीने करण्यात आले आहे.

-*-*-*-*-*-*-

 

 

No comments:

Post a Comment