जालना, दि. 10 (जिमाका) :- जालना एकात्मिक
बाल विकास सेवा योजनेतंर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस पदे मानधनावर भरण्यात येणार आहेत. अर्जाचा विहीत
नमुना ग्राम पंचायत व अंगणवाडी केंद्रात उपलब्ध करुन दिलेला आहे. एकात्मिक बाल विकास
सेवा योजना प्रकल्प-2 अंतर्गत 59 पदे भरण्यात येणार आहेत. तरी किमान बारावी उत्तीर्ण
वय 18 ते 35 दरम्यान असलेल्या स्थानिक महिला अर्जदारांनी शुक्रवार दि.21 फेब्रुवारी
2025 पर्यंत आपले अर्ज जालना येथील पंचायत समितीच्या परिसरातील एकात्मिक बाल विकास
सेवा प्रकल्प-2 येथे सादर करावेत, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी, जालना यांनी
प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment