Thursday, 6 February 2025

शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसीसाठी आवाहन

 


जालना, दि. 7 (जिमाका) :-  जिल्ह्यातील शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्याचा लाभ कायम रहावा यासाठी ई-केवायसी आणि मोबाईल सिडींग करुन घेणे आवश्यक आहे. तरी तहसील कार्यालयाकडून तालुक्यातील गावामध्ये ई-केवायसीसाठी जनजागृतीपर शिबीरे घेण्यात येणार आहेत. तरी शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांनी शिबीरात येवून ई-केवायसी अवश्य करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

स्वस्त धान्य वितरण प्रणाली पारदर्शक व्हावी यासाठी शासनाने सुरु केलेल्या ई-केवायसीबाबत काही शिधापत्रिकाधारक उदासीन दिसत आहेत. 5 लाख 65 हजार 700 लाभार्थ्यांनी अद्यापही ई-केवासी केलेली नसल्याचे दिसुन आले आहे. तरी दि.28 फेब्रुवारी 2025 पर्यंत ई-केवायसी न केल्यास या लाभार्थ्यांना स्वस्त धान्यापासून कायमचे वंचित राहण्याची वेळ येऊ शकते. लाभ मिळण्यासाठी अंत्योदय आणि प्राधान्य गटातील शिधापत्रिका धारकांच्या हाती आणखी काही दिवसाची अवधी आहे. आपल्या तालुक्यातील गावात ई-केवायसी सिडींग करुन घेण्यासाठी सर्व गावामध्ये शिबीर घेण्यात यावेत. अशा सुचना देण्यात आलेल्या आहेत.  शिधापत्रिकाधारक व कुटूंबातील सदस्य स्वस्त धान्यापासुन वंचित राहू नये यासाठी ई-केवायसी करणे अत्यंत गरजेचे आहे. जालना-136942, बदनापुर-49646, भोकरदन-76261, जाफ्राबाद-35551, मंठा-55566, परतूर-56964, अंबड-87168, आणि घनसावंगी -67700 याप्रमाणे तालुकानिहाय शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

 

 

No comments:

Post a Comment