जालना, दि. 17 (जिमाका) :- महाराष्ट्र
शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात
उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य
क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुरस्कारासाठी ऑनलाईन सूचना व हरकती सादर करण्याचा
सुरुवातीचा दि. 15 फेब्रुवारी,2025 तर सुचना व हरकती सादर करण्याचा अंतिम दि. 18 फेब्रुवारी,2025
सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहिल. तरी शिवछत्रपती
राज्य क्रीडा पुरस्कार गुणांकन तक्ते अवलोकनासाठी व सूचना/ हरकती सादर करण्यासाठी ऑनलाईन
https://shivchhatrapatiawards.
क्रीडा
क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जेष्ठ क्रीडा महर्षिकरीता जीवन गौरव पुरस्कार,
क्रीडा मार्गदर्शकांकरीता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/ शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार
(खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा
पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक),
असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. शासनाने दि.29 डिसेंबर,2023 व दि.25 जानेवारी,2024
नुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली,2023 विहित केली आहे. या
नियमावलीनुसार सन 2023-24 या वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील क्रीडा मार्गदर्शक,
खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी उपक्रमात सहभागी झालेले खेळाडू/ व्यक्ती यांच्याद्वारा
दि.14 जानेवारी ते 26 जानेवारी,2025 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने प्राप्त झालेल्या
अर्जाची प्राथमिक छाननी करण्यात आलेले असून, प्राथमिक छाननीचे गुणांकन तक्ते शासननिर्णय
क्रं.शिछपु.2023/प्र.क्रं.188/
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment