जालना, दि. 10 (जिमाका) :- जालना येथील समाज कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या
अडचणी संदर्भात तसेच या कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय वसतिगृह किंवा शासकीय
निवासी शाळेमध्ये पुरविण्यात येणाऱ्या सोईसुविधांविषयी असणाऱ्या समस्या, तक्रारींचे
निराकरण करण्यासाठी समाज कल्याण कार्यालयात दि. 14 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता
लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी
संबधिताने आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात घेऊन सकाळी 11 ते 12 या वेळेमध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन
सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
सामान्य प्रशासन
विभागाने शासन निर्णयान्वये राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागासाठी 100 दिवसाचा कृती
आराखडा निश्चित केला आहे. त्यामध्ये संकेतस्थळ,
सुकर जीवनमान, स्वच्छता, जनेतेच्या तक्रारीचे निवारण, कार्यालयातील सोई-सुविधा, गुतंवणूक
प्रसार व क्षेत्रीय कार्यालयाला भेटी यामुद्द्यावर प्रभावी कार्यवाही करण्याबाबत निर्देश
देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य समाज कल्याण आयुक्तालयाने शासन निर्णयात दिलेल्या
मुद्द्याच्या अनुषंगाने जनतेच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी सहायक आयुक्त स्तरावर लोकशाही दिनाच्या आयोजन करावे
असे निर्देश दिले आहेत. असेही कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment