दिव्यांगांना फिरत्या वाहनावरील दुकानासाठी आवाहन
जालना, दि. 6 (जिमाका)
:- दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी
होण्याच्या दृष्टीने सन 2024-25 साठी हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या
वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना लागू करण्यासंदर्भात
शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही जालना
येथील महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्यादीत यांच्या स्तरावरुन सुरु
करण्यात आली आहे. या योजनेला मिळत असलेला प्रतिसाद आणि मागणी लक्षात घेऊन गरजू दिव्यांग
व्यक्तींना योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी करण्यासाठी पोर्टल https://register.mshfdc.co.in ही
लिंक दि. 10 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12
वाजेपर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग
व्यक्तींनी घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
केले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment