जालना, दि. 11 (जिमाका) :- छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील अपर आयुक्त
(महसूल) यांच्या पत्रान्वये छत्रपती संभाजीनगर विभागाअंतर्गत विभागीय महसूल क्रीडा
व सांस्कृतिक स्पर्धा- 2025 चे आयोजन दि. 14 ते 16 फेब्रुवारी 2025 या
कालावधीमध्ये जालना जिल्ह्यामध्ये करण्यात आले आहे. दि. 14 फेब्रुवारी 2025 रोजी
सकाळी 9 वाजता सदर स्पर्धेचे उद्घाटन
मान्यवरांच्या हस्ते जालना येथील पोलिस मुख्यालय मैदानावर होणार आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी
गणेश महाडिक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
दि. 14 ते 16 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये या स्पर्धांचे आयोजन
जालना जिल्हा मुख्यालयी करण्याबाबत विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली आहे. विभागीय
महसूल स्पर्धेत मराठवाड्यातील 8 जिल्ह्याचे संघ सहभागी होणार असुन मुख्य स्पर्धा
पोलिस मुख्यालय मैदान स. नं. 488 जालना, जिल्हा क्रीडा संकुल व मत्स्योदरी
महाविद्यालय, जालना येथे दि. 14 ते 16 फेब्रुवारी 2025 या कालावधीत आयोजित करण्यात
आलेल्या आहेत. दि.12 व 13 फेब्रुवारी 2025 रोजी क्रिकेट स्पर्धा घेण्यात येणार
आहेत. असेही कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment