Thursday, 3 October 2024

खरपुडी व चंदनझिरा येथे राबविली 'स्वच्छता ही सेवा' मोहीम

 

 

जालना, दि.3 (जिमाका) : युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार द्वारा मेरा युवा भारत या उपक्रम अंतर्गत जालना नेहरु युवा केंद्र व युवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने खरपुडी येथील पार्थ सैनिकी शाळेत आणि चंदनझिरा येथील जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 'स्वच्छता ही सेवा मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. स्वच्छता मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शाळेचे प्राचार्य मोहन नेहरे, उपमुख्याध्यापक ए. के. खराबे, एस. डी. गाभुड, अशोक शिंदे, दिनेश पवार, रोहित गायकवाड यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात गट निदेशक एस.एस. कापसे, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर, आर. एस. पुजारी, पी.डी. झुंजे, आर. एस.साळवे, एस.के.उपाध्यय, एस.जी.चव्हाण, ए.बी.जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती. 

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment