जालना, दि.11 (जिमाका) : जालना
जिल्ह्यात व शहरात दि. 3 ऑक्टोबर, 2024 ते दि. 12 ऑक्टोबर, 2024 पासून नवरात्र
उत्सव साजरा होत असून, दि. 11 ऑक्टोबर, 2024 व दि. 12 ऑक्टोबर, 2024 रोजी देवी
मुर्ती विसर्जनाकरीता मोतीबाग तलाव येथे व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी
विसर्जनासाठी गर्दी असल्यास काही देवी मुर्ती विसर्जनाकरीता घाणेवाडी तलाव येथे
विसर्जनासाठी जाण्याची शक्यता आहे. घाणेवाडी तलावातून पिण्याचे पाणी जालना शहरात
येत असल्याने तेथे देवी मुर्ती विसर्जनासाठी गेल्यास गावकरी त्यास विरोध करु शकतात,
त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दि. 11
ऑक्टोबर, 2024 व दि. 12 ऑक्टोबर, 2024 रोजी देवी मुर्ती विसर्जन कालावधीत व
सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने भारतीय नागरीक
सुरक्षासंहिता 2023 चे कलम 163 अंतर्गत घाणेवाडी तलावाच्या 200 मीटर परिसरात कायदा
व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागु करीत आहे.
अपर जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशानुसार भारतीय नागरिक सुरक्षासंहिता 2023
चे कलम 163 अन्वये घाणेवाडी तलावाच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
लागू राहणार आहेत. हा आदेश दि. 11 ऑक्टोबर 2024 रोजीच्या 6.00 वाजेपासून ते दि. 13
ऑक्टोबर 2024 रोजीच्या 6.00 वाजेपर्यंत अंमलात राहणार असल्याचे अपर
जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment