जालना,दि.8 (जिमाका) : केंद्र शासनाकडून जालना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेची मान्यता मिळाली आहे. तरी जालना जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन दूरदृश्यप्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवार, दि. 9 ऑक्टोबर, 2024 रोजी दुपारी 12 वाजता जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात होणार आहे.
जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा उद्घाटन कार्यक्रम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री जगतप्रकाश नड्डा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. याबरोबर केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव, आरोग्य व कुटूंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती अनुप्रिया पटेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, जालना जिल्हा पालकमंत्री अतुल सावे, खासदार कल्याण काळे, आमदार सर्वश्री राजेश राठोड, विक्रम काळे, सतिष चव्हाण, बबनराव लोणीकर, नारायण कुचे, संतोष दानवे, कैलास गोरंट्याल, राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, वैद्यकीय शिक्षण व आयुष आयुक्त राजीव निवतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. अजय चंदनवाले, वैद्यकीय शिक्षण व संशोधन उपसंचालक डॉ. विवेक पाखमोडे, अधिष्ठाता डॉ. सुधीर चौधरी आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील आदि उपस्थित राहणार आहेत.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment