जालना, दि.16 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 साठी कार्यक्रम दि.15 ऑक्टोबर 2024 रोजी घोषित केला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये निवडणूकीच्या कालावधीत शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विद्रुपीकरण करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.
निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनाकांपासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. काही व्यक्ती, संस्था यांच्याकडुन मोठ्या प्रमाणात अनाधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहिराती लावून शहराचे विद्रुपीकरण करण्यात आले आहे. तसेच निवडणूक कालावधीत राजकीय पक्ष अथवा पक्षाशी संबंधीत व्यक्ती, संस्था यांच्याकडून होर्डिग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहीराती लावून शहराचे विद्रुपीकरण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारत निवडणूक आयोगाने मालमता विद्रुपीकरण करण्यास प्रतिबंध करण्यासंबंधी दिलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सूचित केल्यानुसार महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामीण भागात निवडणूकीच्या कालावधीमध्ये होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भितीवर जाहिरात प्रदर्शित करतांना संबंधित स्थानिक प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच परवानगी संपल्यानंतर ते नष्ट करुन इमारती, मालमत्ता पूर्ववत करुन घेणे, जाहिराती तात्काळ काढून घेणे आवश्यक आहे. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment