जालना, दि.15 (जिमाका) : माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम
यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस सर्वत्र
‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने आज येथील जिल्हाधिकारी
कार्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अपर जिल्हाधिकारी
रिता मैत्रवार यांच्या हस्ते डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण
करुन अभिवादन करण्यात आले.
वाचन
संस्कृती ही प्रत्येक मानवाच्या सोबत वाटचाल करणारी एक महत्वाची प्रक्रिया आहे. वाचन
संस्कृतीचा समाजातील दैनंदिन जीवनशैलीशी व एकूणच समाजातील घडामोडींशी
जवळचा संबंध येत असतो. किंबहूना वाचन संस्कृती म्हणजे समाज
व्यवस्थेचेच महत्वाचे एक रूप आहे. ज्यातून विविध विषयाचे ज्ञान प्राप्त होत असते. वाचनामुळे
मानवी मेंदूला व मनाला नवी दिशा व चालना मिळते असे अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रवार
यावेळी म्हणाल्या.
उपजिल्हाधिकारी
नम्रता चाटे म्हणाल्या की, प्रत्येकाने रोज
एक तरी पुस्तकाचे वाचन करणे आवश्यक आहे. वाचनामुळे आपल्या ज्ञानात विविध विषयाची भर
पडण्यास मदत होते.
वाचन
प्रेरणा दिनानिमित्त मान्यवरांनी पुस्तकांचे वाचन केले. यावेळी वाचन सामान्य प्रशासनाच्या
उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, तहसिलदार सर्वश्री श्रीमती तायडे, श्रीमती मेडके, अनिल
नवहाते यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.
****
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
No comments:
Post a Comment