Thursday, 1 October 2026

05- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक -2026 निवडणूकीचे साहित्य सार्वजनिक ठिकाणी, रहदारीस अडथळा होईल असे लावण्यास निर्बंध

 


   जालना ,दि. 1 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने 05- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक -2026 साठी कार्यक्रम दि.22 सप्टेंबर 2026 रोजी घोषित केला आहे.  महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 33 अन्वये निवडणूकीचे साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल अशा पध्दतीने लावण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तल यांनी जारी केले आहेत.

निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधी किंवा त्यांच्या हितचिंतकाने सार्वजनिक इमारतीचे ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर, निवडणूकीसंबंधी पोस्टर्स, बॅर्नस, पॉम्प्लेट्स, कटआऊट्स, होर्डिंग्ज, कमानी लावणे या व इतर बाबीमुळे रहदारीस अडथळा निर्माण होवु शकेल किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे त्यावर निर्बंध घालणे आवश्यक झाले आहे. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे. हे आदेश दि. 30 सप्टेंबर, 2026 ते दि. 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत संपूर्ण जिल्हा हद्दीत लागु राहतील.

 

******

05- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक -2026 ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध

 


 

जालना ,दि. 1 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक -2026 साठी कार्यक्रम दि.22 सप्टेंबर 2026 रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. सदर निवडणूकीच्या प्रचार मोहीमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास ध्वनी प्रदुषण होणे, सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील शांततेस व स्वास्थास बाधा पोहोचण्याची व उशीरा रात्री पर्यंत ध्वनीक्षेपण यंत्रणा चालु ठेवण्याची शक्यता असल्यामुळे सदर बाबींवर निर्बंध घालणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 मधील प्राप्त अधिकारानुसार निवडणूकीच्या प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाचे वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तल यांनी जारी केले आहेत.

 ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिकारी यांच्या परवानगी शिवाय करता येणार नाही.  सकाळी 6 वाजण्यापूर्वी आणि रात्री 10 वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही.  दिवसा प्रचाराकरिता फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनी क्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा, ध्वनी क्षेपकाच्या आवाजासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल.  सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चीत ठिकाणी ध्वनी क्षेपकाच्या वापरा संबंधीत घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधीत यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील.  ध्वनीवर्धकांचा मग ते एका जागी लावलेले असोत किंवा चालत्या वाहनावर बसविलेले असोत, त्यांचा सकाळी 6 पुर्वी किंवा रात्री 10 वाजेनंतर आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या लेखी पूर्व परवानगीशिवाय करण्यात येऊ नये. संबंधित प्राधिकाऱ्यांच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय, सार्वजनिक सभा आणि मिरवणुका यांच्यामध्येही ध्वनीवर्धकाचा वापर करण्यात येऊ नये. आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहतील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे. हे आदेश दि. 30 सप्टेंबर, 2026 ते दि. 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत संपूर्ण जिल्हा हद्दीत लागु राहतील.

 

*******

                                          


05- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक -2026 धार्मिक स्‍थळे, रुग्‍णालये, शैक्षणिक संस्‍थेसह सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्‍पुरती पक्ष कार्यालये स्‍थापन करण्‍यास निर्बंध जारी

 

05- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक -2026

धार्मिक स्‍थळे, रुग्‍णालये, शैक्षणिक संस्‍थेसह सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्‍पुरती

पक्ष कार्यालये स्‍थापन करण्‍यास निर्बंध जारी

 

जालना ,दि. 1 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने 05- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक -2026 साठी कार्यक्रम दि.22 सप्टेंबर 2026 रोजी घोषित केला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचे जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तल यांनी जारी केले आहेत.

निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये, किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचे जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निर्बंध घालणे आवश्यक झाले आहे. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे. हे आदेश दि. 30 सप्टेंबर, 2026 ते दि. 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत संपूर्ण जिल्हा हद्दीत लागु राहतील.

 

******

05- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक -2026 परवाना धारकांना शस्त्रास्त्रे बाळगण्यास निर्बंध; शस्त्र जवळच्या पोलिस ठाण्यात जमा करावेत

 


 

जालना ,दि. 1 (जिमाका) :   भारत निवडणूक आयोगाने 05- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक -2026 साठी कार्यक्रम दि.22 सप्टेंबर 2026 रोजी घोषित केला आहे. जालना जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातुन निवडणुक घोषित झाल्यापासुन निवडणुक निकाल घोषित होईपर्यत, परवाना दिलेले शस्त्रास्त्रे वाहुन नेण्यावर व बाळगण्यास निर्बंध लागू करण्यात येत आहेत. तरी असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तल यांनी जारी केले आहेत.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती, दंडाधिकारी शक्ती प्रदान केलेले अधिकारी, पोलिस अधिकारी-कर्मचारी, बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरील अधिकारी-कर्मचारी तसेच सराफा यांच्या व्यतिरिक्त तसेच मा. उच्च न्यायालयातील जुन्या रिट पिटीशन 2009/2014 च्या आदेशास अधीन राहुन इतर सर्व परवानाधारक व्यक्तींनी परवाना दिलेले शस्ञास्ञे वाहुन नेण्यावर व बाळगण्यास आदेशान्वये बंदी घालण्यात आली आहे.  शस्त्र परवानाधारकांनी आपले शस्ञ जवळच्या पोलिस ठाण्यात जमा करावेत. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एका आठवड्याचे आत संबधितांचे शस्ञे परत करण्यात यावेत. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे. हे आदेश दि. 30 सप्टेंबर, 2026 ते दि. 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत संपूर्ण जिल्हा हद्दीत लागु राहतील.

*****

05- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक -2026 वाहनावर पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावण्यासंबंधीच्या नियमाचे आदेश जारी

 


 

जालना ,दि. 1 (जिमाका) :   भारत निवडणूक आयोगाने 05- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक -2026 साठी कार्यक्रम दि.22 सप्टेंबर 2026 रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासुन आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. सदर निवडणुक प्रचार फेरी / मिरवणुकामध्ये जास्तीत जास्त 10 वाहने वापरता येतील. उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी दहापेक्षा अधिक वाहने वापर करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तल यांनी जारी केले आहेत.

निवडणुक प्रचार फेरी / मिरवणुकामध्ये जास्तीत जास्त 10 वाहने वापरता येतील. त्यापेक्षा जास्त वाहने वापरण्यास संपूर्ण जालना जिल्ह्यांमध्ये निवडणुक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत निर्बंध घातले आहे. हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहतील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे. हे आदेश दि. 30 सप्टेंबर, 2026 ते दि. 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत संपूर्ण जिल्हा हद्दीत लागु राहतील.

 

*****

05- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक -2026 मोटार गाड्या, वाहनांच्या ताफ्याच्या वापरावर निर्बंध जारी

 


 

जालना,दि. 1 (जिमाका) :   भारत निवडणूक आयोगाने 05- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक -2026 साठी कार्यक्रम दि.22 सप्टेंबर 2026 रोजी घोषित केला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये कोणत्याही वाहनाच्या ताफ्यामध्ये दहापेक्षा अधिक मोटार गाड्या अथवा वाहने वापरण्यास निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तल यांनी जारी केले आहेत.

निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्या निर्देशानुसार कोणत्याही परिस्थितीत सुरक्षेसाठी अ

सलेल्या मोटार गाड्या, वाहने यांच्या ताफ्यात दहा पेक्षा अधिक वाहने नसावीत असे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन कोणत्याही राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी दहा पेक्षा अधिक मोटार गाड्या, वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास प्रतिबंध केला आहे.  असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे. निवडणुक प्रचार फेरी / मिरवणुकामध्ये जास्तीत जास्त 10 वाहने वापरता येतील.

******

 

 

Wednesday, 30 September 2026

ऊसतोड कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल शेतकऱ्यांच्या बांधावर सेवा संकल्प अभियानांतर्गत अंबड येथे ऊसतोड कामगारांचे शिबिर; ऊसतोड कामगारांचा सहभाग

 






 

जालना,दि.30 (जिमाका): ऊसतोड कामगारांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी अंबड महसूल उपविभागाच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत ऊसतोड कामगार समस्या निराकरण व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी शिबिराला भेट देऊन कामगार, विद्यार्थी व शेतकऱ्यांशी संवाद साधला.

शिबिराचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी केले. ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न, कुपोषण, महिलांचे आरोग्य, घरकुल तसेच विविध शासकीय कागदपत्रे व योजनांचा लाभ मिळविताना येणाऱ्या अडचणी त्यांनी मांडल्या. कामगारांना जातीचे दाखले, रेशन कार्ड, आधार कार्ड तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असल्याचे पारधी यांनी यावेळी सांगितले. हे शिबिर केवळ एक दिवसापुरते मर्यादित न राहता कामगारांच्या प्रश्नांवर पुढील काळातही प्रशासनाकडून काम केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ऊसतोडीसाठी जिल्ह्याबाहेर किंवा अन्य ठिकाणी स्थलांतर करण्यापूर्वी कामगारांनी जिल्हा प्रशासनाने विकसित केलेल्या ‘ऊस मित्र’ ॲपवर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले. तसेच, कामावर जाण्यापूर्वी संबंधित ग्रामपंचायतीमध्ये स्थलांतराची नोंद करावी, असेही सांगण्यात आले. कामगारांची नोंद प्रशासनाकडे उपलब्ध झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत शासकीय योजना, मदत आणि आवश्यक सेवा पोहोचविणे सोपे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शिबिरात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी ऊसतोड महिलांशी संवाद साधला. ऊसतोडीसाठी होणारे स्थलांतर कमी करण्यासाठी महिलांनी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगार सुरू करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. अल्प कालावधीत मोठ्या संख्येने कामगारांना एकत्र करून शिबिराचे आयोजन केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी आणि त्यांच्या पथकाचे कौतुक केले.

शिबिरानंतर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी अंबड शहरातील ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या शाळा व वसतिगृहाला भेट दिली. तेथील सुमारे १०० विद्यार्थ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था तसेच इतर सुविधांची त्यांनी पाहणी केली. विद्यार्थ्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करून पुढे जाण्याचे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षिका डॉ. कविता गित्ते यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाबाबत मार्गदर्शन केले. स्थलांतरामुळे मुलांचे शिक्षण प्रभावित होऊ नये, यासाठी पालकांनी विशेष लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले.

शिबिरानंतर जिल्हाधिकारी मित्तल यांनी अंबड तालुक्यातील धनगर पिंप्री शिवाराला भेट देऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. पावसाअभावी तालुक्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. शेताच्या बांधावर जाऊन त्यांनी सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान, चारा टंचाई आणि पाणीटंचाईच्या समस्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. आगामी काळातील पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेबाबतही ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली.

पिकांचे नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी मित्तल यांनी यावेळी केले. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. संकटाच्या काळात प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन त्यांनी केले.

अंबड येथील स्थानिक कार्यालयात झालेल्या या शिबिराला दीड ते दोन हजार ऊसतोड कामगार उपस्थित होते. शिबिराच्या आयोजनासाठी अंबडचे तहसीलदार सोमेश मोहिते आणि घनसावंगीचे तहसीलदार रमेश पागोटे यांनी विशेष परिश्रम घेतले. अखिल भारतीय शबरी माता संघटनेचे दीपक बर्डे, गजानन बर्डे, भाऊसाहेब बर्डे, हरीशभाऊ राठोड तसेच अंबड तालुक्यातील बाजिंदर मोरे यांनीही आयोजनात सहभाग घेतला.

शिबिराला विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच जिल्हा व तालुकास्तरीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ऊसतोड कामगारांच्या समस्या, त्यांच्या मुलांचे शिक्षण आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी याबाबत प्रशासनाने एकाच दिवशी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधितांशी संवाद साधला.

-*-*-*-*-